घरमनोरंजन'फॅमिली मॅन २' च्या प्रदर्शनाबाबत निर्मात्यांची मोठी घोषणा

‘फॅमिली मॅन २’ च्या प्रदर्शनाबाबत निर्मात्यांची मोठी घोषणा

Subscribe

'फॅमिली मॅन' या वेबसीरिजच्या प्रदर्शनाबाबत अनेक अफवा एकायला मिळाल्या होत्या मात्र आता या अफवांबद्दलचा एक खुलासा निर्मात्यांनी केला आहे.

मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली ‘फॅमिली मॅन’ ही वेबसीरिज आली होती. या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून ती प्रचंड गाजली. यानंतर काही दिवसांनी या वेबसीरिजच्या निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग येण्याची घोषणा केली होती. या वेबसीरिजचा दुसरा भाग हा १२ फेब्रुवारीला रिलीज होणार होता. मात्र काही कारणास्तव याचे प्रदर्शन पुढे ठकलण्यात आले असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे यावर अनेक अफवा येत होत्या. पण अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक राज आणि डिके यांनी या अफवा खोट्या असल्याचं सांगितलं आहे. वेब कन्टेक्टरवर लावलेल्या नव्या निर्बंधांमुळे फॅमिली मॅन २ प्रदर्शित होणार नसल्याची चर्चा होती. आता याबाबत वेबसीरिजच्या निर्मात्यांनी एक खुलासा केला आहे. दिग्दर्शक राज आणि डिके यांनी याबाबत कठोर भाष्य करताना एक पोस्ट शेअर केली आहे.


या वेबसीरिजच्या प्रदर्शनाबाबत केलेल्या अफवांना प्रतिउत्तर देताना दिग्दर्शक राज आणि डिके म्हणाले, ”आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट सीझन आणण्यासाठी फार प्रयत्न करत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्हाला हा सीझन नक्कीच आवडेल.” या वेबसीरिजमध्ये मनोज वाजपेयी, समंथा अक्किनेनी, प्रियामणी, शरिब हाश्मी, सीमा बिस्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शाहब अलीस, वेदांत सिन्हा, मेहेक ठाकूर हे कलाकार दिसणार आहेत.

- Advertisement -

हे वाचा-http://रणबीर कपूरला कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -