घरमनोरंजनराहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर

राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर

Subscribe

दोन अयशस्वी विवाहानंतर दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन तिसरे लग्न केले आहे.

दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन याने नुकतेच तिसरे लग्न केले आहे. हे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेत. राहुलने एका पंचवीस वर्षीय परदेशी महिलेसोबत लग्न केले आहे. नताल्या इलिना असे त्याच्या नवीन पत्नीचे नाव आहे. मुंबईतील मलबार हिल परिसरात हे लग्न करण्यात आले. राहुलला तिसरे लग्न थाटात करायचे नव्हते म्हणून तिसऱ्या लग्नाला २५ पाहूणे उपस्थित होते. दोन अयशस्वी विवाहानंतर राहूलने तिसरे लग्न केले. राहुलने आपल्या लग्नाची कबुली दिली मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिली आहे. मागील काही महिन्यांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबध होते. यानंतर या दाम्पत्याने विवाह करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत हा विवाह सोहळा संपन्न झाला असून राहुलला सोशल मीडियावरून शुभेच्छा येत आहेत.

विवाहाबद्दल राहुल काय म्हणाला

“मागील दोन्हीही विवाह सोहळे मोठ्या थाटात पार पडले मात्र दोन्ही लग्न अयशस्वी ठरले. त्यामुळे तिसऱ्या लग्नामध्ये अधिक पाहूण्यांना मी नतालिया (पत्नी) ला मागील दीड वर्षांपासून ओळखतो. मागील काही महिन्यांपासून आम्ही प्रेमसंबधात आहोत.”- राहुल महाजन

- Advertisement -

यापूर्वी दोन वेळा केले लग्न

यापूर्वी राहुल महाजन याने दोन लग्न केलीत. राहुलने  वैमानिक श्वेता सिंग बरोबर लग्न केले. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर राहुलने रिअॅलिटी शो मधून डिंपी गांगुलीशी लग्न केले. मात्र लग्नानंतर त्यांच्यात वाद सुरु झाले. यालग्नानंतर पाच वर्षातच त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर राहुलने आता तिसरे लग्न केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -