Rakhi Sawant mother died : राखी सावंतच्या आईचे निधन

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. राखीची आई जया सावंत या गेल्या अनेक दिवसांपासून टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी लढत होत्या.

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांचे निधन झाले आहे. राखीची आई जया सावंत या गेल्या अनेक दिवसांपासून टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी लढत होत्या. राखीच सावंतचा पती आदिल खान दुर्रानी यांनी जया सावंत यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (rakhi sawant mother jaya sawant died after brain tumour and cancer was admitted in hospital)

अनेक दिवसांपासून अभिनेत्री राखी सावंत तिच्या आईला रुग्णालयात भेटायला जाताना दिसत होती. राखी सावंतच्या आईच्या प्रकृतीसाठी तिचे चाहते सतत प्रार्थना करत होते. इतकेच नाही तर राखी तिच्या चाहत्यांना आईच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करत होती. परंतु, आज राखीच्या आईचे निधन झाल्याने राखीसह तिच्या चाहत्यांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

नुकताच झालेल्या मराठी बिग बॉसच्या कार्यक्रमातून राखी सावंत बाहेर पडली. त्यावेळी तिने थेट रुग्णालय गाठलं आणि एका लाईव्ह सेशनच्या माध्यमातून चाहत्यांना आईच्या तब्येतीची माहिती दिली. त्यावेळी तिने चाहत्यांना आपल्या आईला कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमर झाल्याचे सांगितले होते.

नुकतंच राखी सावंतने ई टाईम्सशी बातचीत केली. त्यावेळी ती म्हणाली, “आई आता या जगात नाही. गेल्या काही दिवसांपासून ती गंभीर आजाराशी झुंज देत होती. तिच्या किडनी आणि फुफ्फुसात कर्करोग पसरला होता. त्यानंतर आज तिचे सर्व अवयव निकामी होत गेले आणि तिचे निधन झाले”.

राखी सावंतच्या आई जया या गेल्या ३ वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन ट्युमरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी (२८ जानेवारी) रात्री ८.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एप्रिल २०२१ मध्ये राखी सावंतच्या आईची कर्करोगाचे यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आईवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर राखीने सलमान खान आणि सोहेल खान यांचे आभार मानले होते. त्यांनी राखीच्या आईच्या उपचाराचा खर्च उचलण्यास मदत केली होती.


हेही वाचा – नव्या आर्थिक वर्षात महावितरणच्या ग्राहकांना दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता