राखीला मिळाला ‘फाळके पुरस्कार’! नेटीझन्सला बसत नाहीये विश्वास

राखी सावंतला बॉलिवूडमधील उत्कृष्ट आयटम डान्सरकरिता दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बॉलिवूड विश्वात आइटम डान्स करणारी तसेच वादग्रस्त विधानाकरिता नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सांवतला नुकतेच दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. राखीला हा पुरस्कार Best Item Dancer करिता देण्यात आला. हा पुरस्कार राखीला प्रदान केल्यानंतर काहींनी तिला शुभेच्छा दिल्यात तर काहींनी प्रश्न उपस्थित केले आहे. यासोबतच दादासाहेब फाळके हा पुरस्कार राखीला दिल्याने नेटीझन्सचा विश्वास बसत नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


शनिवारी पार पडलेल्या सोहळ्यात राखी सावंतला बॉलिवूडमधील उत्कृष्ट आयटम डान्सरकरिता दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूडमधील आयटम डान्सर म्हणून तिचे स्वागत करत मलायका अरोराने हा पुरस्कार राखीला मिळाल्याने तिला शुभेच्छा दिल्या, तसेच तिने राखी सावंत ही मुळातच बॉलिवूडची आयटम डान्सर असून हा पुरस्कार मिळवून राखीने सिद्ध केल्याचे मलायका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

#rakhisawant performing today at the #dadasahebphalkefilmfoundationawards2019 . #yogenshah @yogenshah_s

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

तर हा पुरस्कार मिळाल्याने राखीने देवाचे आभार मानले. आता पर्यंत सर्व भाषेतील ७५-१०० आयटम सॉन्ग्स केले, बरेच रिअॅलिटी शो देखील केलेत परंतु कोणताच पुरस्कार मिळाला नाही. मात्र आयटम डान्सकरिता सन्मानित केल्याबद्दलही आभार मानले.

काही पत्रकारांनी राखी सावंतला पुरस्कार खरेदी केला का? असा थेट प्रश्न विचारला असता, या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत सांगितले की हा पुरस्कार मी डिजर्व करते. तसेच, जेव्हा कलाकारांना पुरस्काराने सन्मानित केले जाते तेव्हा त्यामुळे प्रेरणा देते.