घरमनोरंजनरणबीर- आलिया वाढदिवसासाठी जोधपूरमध्ये, पण चर्चा मात्र लग्नाची

रणबीर- आलिया वाढदिवसासाठी जोधपूरमध्ये, पण चर्चा मात्र लग्नाची

Subscribe

बॉलिवूडमधील हॉट कपल रणबीर कपूर आणि आलिया भट गेल्या ४ वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांना डेट करतायत. काही दिवसांपासून दोघं लवकरचं लग्न करणार अशा चर्चा रंगत होत्या. अशातच रणबीर कपूर वाढदिवसानिमित्त आलिया रणबीरसह जोधपूरमध्ये पोहचली आहे. जोधपूर एअरपोर्टवरील दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणबीर-आलियाच्या या सरप्राइज ट्रीपमुळे दोघांबद्दल सध्या नवी चर्चा रंगू लागली आहे ती म्हणजे रणबीर आणि आलिया जोधपूरमध्ये त्यांच्या वेडिंग वेन्यू पाहण्यासाठी गेले आहेत.

जोधपूरमध्ये आलिया टाई-डाई ग्रीन डेनिम जॅकेट आणि जीन्समध्ये दिसली तर रणबीर बरगंडी रंगाच्या कॅज्युअल आऊटफिटमध्ये कॅमेऱ्यात कैद झालाय. एअरपोर्टवरील दोघांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रणबीर कपूर २८ सप्टेंबरला त्याचा ३९ वा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दोन दिवसआधी त्यांची जोधपूर ट्रीप स्पेशल सेलिब्रेशन असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी त्यांच्या वेडिंग वेन्यूची चर्चा देखील रंगतोय मात्र दोघांकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -


रणबीरने गेल्यावर्षी कुटुंबियांसह त्याचा वाढदिवस साजरा केला. रणबीरच्या त्या बर्थडे पार्टीच्या फोटोंमध्ये आलिया भट्टसह रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर साहनी एकत्र लंच करताना दिसले. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये रणबीर आलियासह दोन केकच्या समोर उभा राहून पोज करताना दिसला.

रणबीरने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर कोरोना व्हायरस नसता तर कदाचित त्याने आलियाशी केव्हाच लग्न केल असते. मात्र यावर बोलून आता मी नजर लावू इच्छित नाही. मी आयुष्यात या ध्येयाला लवकरंच पूर्ण करु इच्छितो. रणबीरच्या या वक्तव्यामुळे आत्ता दोघं लवकरचं लग्नबंधनात अडकणार हे निश्चित आहे. मात्र हा लग्नसोहळा नेमका कधी आणि कुठे पार पडतो हे अद्याप समोर आलेले नाही. यावर रणबीर आणि आलियानेही बोलणं टाळलं आहे. त्यामुळे जोधपूरमधील दोघांच्या स्पेशल ट्रीपमधील वेडिंग वेन्यूची चर्चा कितपत खरी आहे. हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल.

- Advertisement -

रणबीर आणि आलिया यांच्या कुटुंबियांमध्ये एक चांगले बाँडिंग आहे. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात. अनेकदा आलिया तिच्या सोशल मीडिया पोस्टवर दोघींबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते. दुसरीकडे रणबीरदेखील अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत चिल करताना दिसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

रणबीर-आलिया ही जोडी लवकरचं अयान मुखर्जीच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. रणबीर-आलिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानचीही छोटी भूमिका आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -