Ramayana: राम आणि रावणाच्या रुपात दिसणार रणबीर आणि हृतिक!

Ranbir Kapoor to play Ram, Hrithik Roshan Ravana in Ramayana Movie
Ramayana: राम आणि रावणाच्या रुपात दिसणार रणबीर आणि हृतिक!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि हृतिक रोशन रविवारी जॅकी भगनानीच्या ऑफिसच्या बाहेर दिसले होते. माहितीनुसार, फिल्ममेकर जॅकी भगनानी दोघांसोबत एक चित्रपट करू इच्छित आहेत. दरम्यान यानंतर रणबीर आणि हृतिक नमित मल्होत्राच्या मिटिंगमध्ये दिसले होते, जी मिटींग रामायण चित्रपटासंदर्भात असल्याचे म्हटले जात आहे. या मिटिंगला नितेश तिवारी आणि मधू मानतेना देखील उपस्थित होते.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, हृतिक रोशन आणि रणबीर कपूरला रावण आणि रामच्या भूमिकेसाठी निश्चित केले गेले आहे. दोघांची ही पहिली मिटिंग होती, ज्यामध्ये रामायण प्रोजेक्ट संदर्भात चर्चा केली गेली. पुढच्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोघांना रावण आणि रामाच्या भूमिकेसाठी अनेक गोष्टी करण्यासाठी सांगितल्या गेल्या आहेत.

दरम्यान अजूनपर्यंत निर्मात्यांनी सीताच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीचे नाव निश्चित केले नाही आहे. यापूर्वी सीता भूमिकेसाठी करीना कपूर खान आणि रिया चक्रवर्ती यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण अजूनही रामायण चित्रपटाबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही आहे. माहितीनुसार टीम राम, रावण आणि सीतासारख्या भूमिका क्रिएटिव्हजच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या अशी तयारी सुरू आहे. तसचे सध्य हृतिक आणि रणबीर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये स्वस्त नाही आहेत. त्यामुळे रामायणच्या टीमने दोघांशी भेटून चर्चा केली आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा हृतिक आणि रणबीर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.


हेही वाचा – Mumbai cruise drug bust case: ड्रग्जच्या सौदेबाजीसाठी कोड वर्डचा वापर, आर्यनच्या मोबाईलमध्ये धक्कादायक माहिती