रसिका आणि आदितीचा वेगळा अंदाज ‘यू अॅण्ड मी’!

रसिका आणि आदिती चा नवीन अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.' यू अॅण्ड मी' या अल्बममधून या दोघींचा वेगळा अंदाज प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या गाण्याचा मेकिंगचा व्हीडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे.

Rasika sunil
रसिका सुनील

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया आजही सगळ्यांच्या मनात घर करून आहे. आपल्या नटखट अंदाजात साकारलेली खलनायक शनाया प्रेक्षकांना आवडली होती. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया आणि इशाची मैत्री सगळ्यांनाच माहिती आहे. या दोघांनीही आपल्या मस्तीने मालिकेत मज्जा आणली होती. आता पुन्हा हीच मस्ती करायला या दोघी सज्ज झाल्या आहेत. या दोघींचा ‘यू अऍण्ड मी’ हा नवीन अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याच्या मेकिंग व्हिडिओची झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

‘जरा सा कट्टा टाकू आता…जरासी बाते तेढीमेढी..थोडासा किस्सा करू आता..थोडीशी यादे तेरी मेरी..करू आम्ही मनमानिया…ऐसी है अपनी यारिया..’ असं म्हणत रसिका सुनील आणि आदिती द्रविड मस्ती करताना दिसणार आहेत. व्हिडिओ पॅलेसने या अल्बमची निर्मिती केली आहे.

‘यू अॅण्ड मी ‘हे गाणं अभिनेती आदिती द्रविड हिने लिहिलं आहे. तर आदिती आणि रसिकाने हे गाणं गायलं आहे. नुकतंच अदितीने या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात अदिती व रसिका डान्स स्टेप दाखवत आहे. या स्टेप या दोघींना कोरिओग्राफर फुलवा खामकर शिकवत आहे.

लोणावळा येथे या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस या गाण्यात परिधान केले आहेत. अभिनयानंतर रसिका आणि आदितीचा आणखी एक गुण प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.