घरमनोरंजनकोहिनूर वादात रवीना टंडनने घेतली उडी; शेअर केला जबरदस्त व्हिडीओ

कोहिनूर वादात रवीना टंडनने घेतली उडी; शेअर केला जबरदस्त व्हिडीओ

Subscribe

या पोस्टमध्ये रवीनाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर जॉन ओलिवरचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास ब्रिटनने दिलेल्या नकाराची खिल्ली उडवली होती.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आपल्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. रवीना टंडन अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर देखील आपल्या प्रतिक्रिया देत असते. सध्या अशीच एक पोस्ट रवीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रवीनाने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर जॉन ओलिवरचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास ब्रिटनने दिलेल्या नकाराची खिल्ली उडवली होती.

नुकत्याच काही दिवसापूर्वी ब्रिटनची रानी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झालं. तेव्हापासून कोहिनूर शब्द सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. खरंतर कोहिनूर हा सर्वात महागडा हिरा असून तो रानीच्या मुकुटावर लावलेला आहे. अनेक इतिहासकारांच्या मते, हा दुर्लभ हिरा महारानीला ईस्ट इंडिया कंपनीने भारतातून चोरी करून ब्रिटीश मुकुटासाठी भेट म्हणून दिला होता. त्या काळी भारत ब्रिटीश शासनाच्या अधीन होते. त्यामुळे भारतातून पळवून नेलेला तो हिरा ब्रिटीशांनी पुन्हा द्यावा. अशी मागणी भारतीयांकडून सोशल मीडियाद्वारे केली जात आहे. याचं विषयात आता अभिनेत्री रवीना टंडनने देखील उडी घेतली आहे.

- Advertisement -

रवीनाची पोस्ट होतेय व्हायरल

रवीना टंडनने तिच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “जबरदस्त! त्यांचा विनोद. पूर्ण ब्रिटीश संग्राहालयाला सक्रिय अपराध स्थळ घोषित करायला हवे.” रवीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण त्यावर कमेंट करत आहेत.

- Advertisement -

महाराणा रणजीत सिंह यांनी केला होता दान
मिळालेल्या माहितीनुसार, महाराजा रणजीत सिंह यांनी कोहिनूर हिरा आपल्या इच्छेने श्रीजगन्नाथ यांना दान केला होता. त्या काळी महाराजा रणजीत सिंहने अफगानिस्तानचा नादिर शाह विरोधात लढाई जिंकल्यानंतर हा हिरा जगन्नाथ मंदिरात दान केला होता.इतिहासकार आणि शोधकर्त्यांच्या मते, 1839 मध्ये रणजीत सिंहचा मृत्यू झाला आणि 10 वर्षांनंतर इंग्रजांनी कोहिनूरला त्यांचा मुलगा दलीप सिंहकडून हिसकावून घेतला.


हेही वाचा :

कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी जगन्नाथ पुरी संघटनेकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -