…या प्रकल्पामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार, मुख्यमंत्र्यांकडून न्हावा शेवा प्रकल्पाची पाहणी

cm eknath shinde

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्हावा शेवा प्रकल्पाची पाहणी केली. तसेच या भागातील लोकांना नवीन होणारं विमानतळ असेल किंवा जेएनपीटी असेल हा एमटीएचएल प्रोजक्ट येथील लोकांना नक्कीच सोयीस्कर ठरेल. २२ किमीचा हा प्रोजेक्ट असून सर्वात मोठा सी लिंकचा प्रोजेक्ट आहे. यामुळे प्रदूषणात घट होईल. तसेच इंधन आणि वेळेची बचत होईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळ ते म्हणाले की, मुंबई ते रायगड असा हा दोन तासांचा प्रवास असणार आहे. जवळपास १०० किमी १ तासांत एवढं स्पीड डिझाईन करण्यात आलंय. वाहतूक कोंडी झाल्यास प्रवासाला अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. मुंबईतला माणूस अवघ्या २० मिनिटांत रायगड येथील चिर्ले येथे लँड होऊ शकतो. यामुळे प्रदूषणात घट होईल. दरवर्षी जे २६ हजार टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन होतं त्यामध्ये घट होईल. त्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होईल.

लाखो लोकांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे. जवळपास १ लाख वाहनं दररोज ये-जा करू शकतात. अशा प्रकारची या प्रकल्पाची क्षमता आहे. खऱ्या अर्थाने हा खूप मोठा प्रकल्प आपण लोकांना देणार आहोत. तसेच लवकरात लवकर या प्रोजेक्टचं लोकापर्ण करणार आहोत, अशी तयारी देखील एमएमआरडीएची आहे. या प्रकल्पाचं ८४ टक्के काम झालं आहे. उर्वरीत कामं ही निर्धारीत वेळेच्या पूर्वी होणार आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा प्लॅन बी काय? ‘या’ ठिकाणावर नजर