Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'ससुराल सिमर का 2' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज, पहा मालिकेच्या लॉंच ...

‘ससुराल सिमर का 2’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज, पहा मालिकेच्या लॉंच पार्टीचे फोटो

मालिकेच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. तसेच पहिल्या सीझनचा शेवटचा भाग हा 2 मार्च 2018 ला प्रसारित झाला होता.

Related Story

- Advertisement -

हिंदी वाहिनी कलर्स टिव्ही वरील सुप्रसिद्ध मालिका ‘ससुराल सिमर का’  प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती. आता पुन्हा एकदा दूसरा भाग घेऊन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या भागामध्ये प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री दीपिका कक्कड सिमरच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. याच सोबत मालिकेमध्ये नव्या कलाकारांनी देखील एंट्री केली आहे. अभिनेत्री तान्या शर्मा या मालिकेमध्ये रीमा नारायणी च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतच तान्या शर्माने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर ‘ससुराल सिमर का 2’ च्या लाँन्च पार्टी चे इन्साइड फोटोज शेअर केले आहेत.तान्या शर्मा हिने इंस्टा स्टोरी  पोस्ट करत ‘ससुराल सिमर का 2’ असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहतं “So soooooo happy Today!! grateful for this wonderful family” असं देखील लिहलं आहे. तसेच फोटो मध्ये ‘ससुराल सिमर का 2’ मधील संपूर्ण टिम आणि स्टार कास्ट दिसत आहे.

- Advertisement -

मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला असून सोमवार ते शनिवार 6:30 वाजता कलर्स वाहिनी वर प्रसारित होणार आहे. मालिकेच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. तसेच पहिल्या सीझनचा शेवटचा भाग हा 2 मार्च 2018 ला प्रसारित झाला होता. आता प्रेक्षक दीपिका कक्कडला सिमर च्या भूमिकेत पाहण्यासाठी विशेष उत्सुक आहेत.


हे हि वाचा – मालदीवच्या रोमॅंटिक व्हॅकेशनहून परतले रणबीर आलिया

- Advertisement -