घरमनोरंजनVideo : आर्चीच्या नव्या ‘मेकअप’ची झलक

Video : आर्चीच्या नव्या ‘मेकअप’ची झलक

Subscribe

गणेश पंडितने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार

‘सैराट’ चित्रपटातून अभिनयची सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरूच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्यानंतर तिला मराठी चित्रपट विश्वात वेगळी ओळख मिळाली. नागराज मंजुळेंच्या सैराटमधून पदार्पण करत तिने प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. या तिच्या यशानंतर रिंकूचा आगामी नवा चित्रपट लवकरत चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

रिंकूच्या या आगामी मेकअप या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात आतापर्यंत कधीही न पाहिलेली रिंकू सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. तसेच यामध्ये सोज्वळ अभिनेत्री म्हणून ती दिसणार नसून दंगा करणारी रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या रिंकूचा चर्चेत असणाऱ्या मेकअपच्या टीझरमध्ये तिचे वेगळेच रूप बघायला मिळत असून रिंकू साडीपासून ते वेस्टर्न आऊट फिटमध्ये चाहत्यांना दिसणार आहे.

View this post on Instagram

Black and white?

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

- Advertisement -

गणेश पंडितने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिंकुसोबत या ट्रेलरमध्ये चिन्मय उद्गीरकरदेखील दिसतोय. मात्र त्याची कोणती भूमिका या चित्रपटात असणार आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू आणि चिन्मय ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

The eyes tell more than Words could ever say.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

- Advertisement -

नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकूचा हा बिनधास्त अंदाज तसेच तिचा हा ‘मेकअप’ कशासाठी आहे, यासाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -