पंतप्रधान मोदींना गुजरात दंगलीप्रकरणी क्लीन चीट

Narendra Modi wins 2019 general election
पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुजरात दंगलीवरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींना मौत का सौदागर असे संबोधल होते. सोनिया गांधी यांच्या विधानावरुन बराच वाद निर्माण झाला होता. त्याच २००२ च्या दंगलीप्रकरणी आता मोदींना क्लीन चीट मिळाली आहे. नानावटी-मेहता आयोगाचा अहवाल आज गुजरात विधानसभेत मांडण्यात आला. या अहवालातून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. गोध्रा रेल्वे स्टेशन येथे रेल्वेला लागलेल्या आगीनंतर उसळलेली दंगल ही पुर्वनियोजित नव्हता, असा निर्वाळाही या अहवालाने दिला आहे.

२००२ साली साबरमती एक्सप्रेसला गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ आग लावण्यात आली होती. या आगीत ५९ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातमध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली होती. केंद्रात त्यावेळी एनडीएचे सरकार होते. दंगलीनंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्माचे पालन करा, असा सल्ला दिला होता. या दंगलीची चौकशी करण्यासाठी नानावटी-मेहता आयोगाची समिती स्थापन करण्यात आली होती. आयोगाने आपला चौकशी अहवाल आज गुजरात विधानसभेला सादर केला. तसेच गुजरातचे तत्कालीन मंत्री हरेन पंड्या, अशोक भट्ट आणि भरत बारोट यांचाही कोणताही हात नसल्याचे आयोगाने अहवालात नमूद केले आहे.