घरमनोरंजनमुंबईच्या रस्त्यांपेक्षा दिल्ली आणि मथुरेचे रस्ते बरे! हेमा मालिनींचा संताप

मुंबईच्या रस्त्यांपेक्षा दिल्ली आणि मथुरेचे रस्ते बरे! हेमा मालिनींचा संताप

Subscribe

मुंबईच्या या समस्येवरून अनेकांकडून टीका देखील केली जाते, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही. अशातच या संदर्भात बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा उपस्थित राहतो. मुंबईच्या या समस्येवरून अनेकांकडून टीका देखील केली जाते, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही. अशातच या संदर्भात बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीत हेमा मालिनीने या विषयावर संताप व्यक्त केला आहे.

एका मुलाखतीत बोलताना हेमा मालिनी यांनी पावसाळ्यात मुंबईमध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील खडडे यांबाबत संताप व्यक्त केला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “मुंबईच्या रस्त्यांची परिस्थिती पाहता एखादी गर्भवती महिला प्रवास कसा करणार? हा विचारच मला सहन होत नाही. मी प्रवास करते तेव्हा रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि खड्डे पाहून घाबरले. यापूर्वी दिल्ली आणि मथुरामध्ये देखील वाहतूक कोंडी व्हायची. पण आता तिथली परिस्थिती सुधारलेली आहे. मात्र मुंबई अजूनही तशीच आहे.”

- Advertisement -

त्यानंतर त्या म्हणाल्या की, मी मुंबईमध्ये शूटिंग दरम्यान अनेक ठिकाणी प्रवास करते. पण आता हा प्रवास मला नकोसा वाटतो. मुंबई काय होती, आता काय झाली. मुंबईच्या रस्त्यांची ही अवस्था पाहून हेमा मालिनीने याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, हेमा मालिनी यापूर्वी शिमला मिरची या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात राजकुमार राव आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत होते. याशिवाय त्यांनी आत्तापर्यंत ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘बागबान’, ‘नशीब’ यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांना ९० च्या दशकातील ‘ड्रिम गर्ल’ म्हणून देखील ओळखले जात होते.

- Advertisement -

 


हेही वाचा :आम्हाला धोका दिला, मुंबईकरांना देऊ नका; आरे कारशेडवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -