आम्हाला धोका दिला, मुंबईकरांना देऊ नका; आरे कारशेडवरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

सरकार आपल्या पहिल्याच दिवशी मुंबईवर घाला घालण्याचा निर्णय कसं घेऊ शकतं, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. आम्हाला धोका दिला, पण मुंबईला धोका देऊ नका, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Minister Aditya Thackeray said Worli has become famous due to its international standard rifle shooting training center

शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्या नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन आज होत आहे. यावेळी, बंडखोर आमदारांना (Rebel MLA) अत्यंत कडेकोट बंदोबस्तात विधानभवनात आणलं गेलं. दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारने पहिल्याच दिवशी आरे कारशेडबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका केली. (Dont Cheat on Mumbaikar’s, aditya thackeray request to new government)

हेही वाचा – बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं आणलं, कसाबसाठीही एवढा बंदोबस्त नव्हता; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

सरकार आपल्या पहिल्याच दिवशी मुंबईवर घाला घालण्याचा निर्णय कसं घेऊ शकतं, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. आम्हाला धोका दिला, पण मुंबईला धोका देऊ नका, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

कारशेडविषयी बोलताना ते म्हणाले की, आमच्यावर जो राग आहे तो मुंबईवर काढू नका. आम्हाला धोका दिला, पण मुंबईला धोका देऊ नका. आरेचं जंगल मुंबईसाठी महत्त्वाचं आहे. आरेसाठी दोन पर्याय आहेत. कांजूर आणि पहाडी गोरेगाव. मेट्रो मार्गिका सहासाठी कारशेड तयार झाली नव्हती. मेट्रो ६ च्या कारशेडसाठी २०१८ साली एमएमआरडीएने कांजूरमार्गचा पर्याय सुचवत पत्र लिहिलं आहे. या पर्यायांवर काम सुरू होतं. त्यामुळे नव्या सरकारला माझी हीच विनंती आहे की मुंबईचा विचार करा, मुंबईकरांचा विचार करणं गरजेचं आहे.

हेही वाचा…तर, आपण राज्याचे मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

आमचं सरकार बनलं होतं तेव्हा सर्वात आधी आम्ही आरे कारशेडला आम्ही स्थगिती दिली होती. पण मेट्रो ३ चं काम जोरात सुरू होतं. कोविड काळातही काम सुरू होतं. त्यामुळे मुंबईकरांना धोका देऊ नका. आम्हाला जो धोका दिला तो मुंबईकरांना देऊ नका. आरे कारशेड हा केवळ तेथील झाडांचा प्रश्न नाहीय, पण जैवविविधतेचा प्रश्न आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाला कुलूप, कारण काय?

दरम्यान, आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन असल्याने आदित्य ठाकरे आरे कारशेडविरोधातील आंदोलनाला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी ट्विट करूनही त्यांची भूमिका मांडली आहे.

आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

मला आज विधानसभेच्या बैठकीला उपस्थित राहायचे असल्याने, आरे जंगल आणि एमएमआरसीएलच्या जमिनीच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनाला मी येऊ शकत नाही. मी नम्रपणे नवीन सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करतो. आमचा द्वेष मुंबईवर टाकू नका.

आरे म्हणजे केवळ २७०० झाडे नाहीत, तर तेथील जैवविविधताही आपल्या मुंबईकरांसाठी गरजेची आहे. कारशेडच्या ठिकाणी आणि त्याच्या आजूबाजूला बिबट्या आणि इतर लहान प्रजातींचे दररोज दर्शन होते. म्हणूनच आरेतील ८०० एकर पेक्षा जास्त जागा जंगल म्हणून घोषित केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.

हेही वाचा – विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला व्हिप लागत नाही, शिवसेनेच्या आदेशावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

कारशेडच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली असताना, मार्ग 3 चे काम सुरू ठेवण्यासाठी पूर्ण सहकार्य केले. कांजूरमार्ग हा पर्याय मेट्रो लाईन 3,4,6,14 साठी एका जागेत डेपोमध्ये बसेल, त्यामुळे खर्च आणि वेळेची बचत होईल.

मेट्रो मार्गिका सहाच्या कारशेडचा विचार कांजूरमार्ग आणि पहाडी गोरेगाव येथे करण्यात आला होता. या कारशेडचा वापर मेट्रो तीनसाठीही करता आला असता. मेट्रो प्रत्येक प्रवासानंतर कारशेडमध्ये जात नाही.