घरमनोरंजनईशा अंबानीची 'महागडी' लग्नपत्रिका; किंमत वाचून...

ईशा अंबानीची ‘महागडी’ लग्नपत्रिका; किंमत वाचून…

Subscribe

खास पाहुण्यासांठीच ही शाही पत्रिका तयार करण्यात आल्याचं समजतंय. या रॉयल लग्नपत्रिकेचा एक व्हिडिओसुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

नावाजलेले उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मुकेश यांची मुलगी ईशा अंबानीचा आनंद पिरामलसोबत १२ डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. उदयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या ग्रँड विवाह सोहळ्याला मनोरंजन आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ईशा अंबानीच्या शाही आणि महागड्या लग्नपत्रिकेची. ईशा अंबानीची लग्नपत्रिका म्हटलं म्हणजे ती खास असणारच. या लग्नपत्रिकेची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. उपलब्ध माहितीनुसार, ईशाच्या एका लग्नपत्रिकेची किंमत सुमारे ३ लाख रुपये इतकी आहे. काही खास पाहुण्यासांठीच ही शाही पत्रिका तयार करण्यात आल्याचं समजतंय. पत्रिकेतील रंगसंगती, त्याचं डिझाईन याचंही नेटिझिन्सकडून कौतुक होत आहे. या रॉयल लग्नपत्रिकेचा एक व्हिडिओसुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्हीही पाहा, ३ लाखांच्या या लग्नपत्रिकेत काय आहे खास…


ईशा होणार ‘मिसेस पिरामल

सध्या सगळीकडे ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या भव्य लग्नसोहळ्याचीच चर्चा आहे. मिसेस पिरामल होऊ घातलेल्या अंबानी कन्येचा विवाहसोहळा तिला शोभेल अशा शाही पद्धतीने होईल यात काहीच शंका नाही. संपूर्ण जगाचं लक्ष आता या सोहळ्याकडे लागून राहिलं आहे. ईशा आणि आनंद यांचा साखपुडाही धमाकेदार पद्धतीने झाला होता. इटलीच्या लेक कोमोमध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा साखरपुडा पार पडला. २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर असा तीन दिवसांचा हा शाही सोहळा होता. अनिल कपूर, सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहूजा, प्रियंका चोप्रा, निक जोन्स, जुही चावला आणि जान्हवी कपूरसारख्या अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी यावेळी हजेरी लावली होती. आता ईशाच्या लग्नाला कोणकोणते स्टार्स हजर राहणार हे पहाणं औत्सुक्याचं ठरेल.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल

वाचा: रणवीर–दीपिका इटलीसाठी रवाना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -