घरमनोरंजन'चक दे गर्ल' सागरिका साकारणार फुटबॉल खेळाडू!

‘चक दे गर्ल’ सागरिका साकारणार फुटबॉल खेळाडू!

Subscribe

बॉलीवूडमध्ये आपली छाप पा़डलेली मराठमोळी अभिनेत्री, सागरिका घाटगे लवकरच एका नवीन सिनेमातून आपल्यासमोर येतेय. चक दे इंडिया या सिनेमातून बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण करत, सागरिका घाटगेने मराठी तसंच अमराठी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं.

‘मानसून फुटबॉल’ या आगामी सिनेमातून सागरिका पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या नव्या-कोऱ्या सिनेमात सागरिका एका फुटबॉल खेळाची आवड असलेल्या एका गृहिणीची भूमिका साकारते आहे. दिग्दर्शक मिलींद उके यांनी मानसून फुटबॉल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

- Advertisement -

या सिनेमाचं शूटिंग जुलै महिन्यापर्यंत सुरु होणार आहे. मात्र सागरिकाने भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी आतापासूनच फुटबॉलचे धडे घ्यायला सुरुवात केली असल्याचं समजतंय. ‘हा सिनेमा करताना आपला पती- जाहिर खान याचा उत्तम पाठिंबा लाभल्याचं सागरिका सांगते. चक दे इंडिया नंतर पुन्हा एकदा खेळावर आधारित असलेल्या एका सिनेमात काम करण्याची संधी मिळणं, हे माझं भाग्य असल्याचंही ती सांगते. सागरिका सिनेमासाठी फुटबॉल प्रशिक्षकाकडून रितसर प्रशिक्षण घेणार असल्याची चर्चा आहे.

फुटबॉल खेळावर आधारित येणारा हा नवा सिनेमा आणि त्यातील सागरिकाच्या ‘हटके’ भूमिकेचं, प्रेक्षक कसं स्वागत करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -