मराठमोळ्या सई ताम्हणकरने पटकावला IIFA 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड ॲण्ड ब्यूटीफुल अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सईने मराठी टेलिव्हिजनपासून ते मोठमोठ्या चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. सई ताम्हणकरला मराठीसिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी ओळखले जाते. मात्र सोशल मीडियावरील नवनवीन पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असणारी सई आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. याचे कारण म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकरला इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी म्हणजेच आयफा (IIFA) या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेला आहे. सईला ‘मिमी’ या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

यावर्षीचा IIFA 2022 पुरस्कार सोहळा दुबईतील अबूधाबी येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये सलमान खान, शाहरूख खान, विकी कौशल, कृती सेनन, ऐश्वर्या बच्चन, अनन्या पांडे, सई ताम्हणकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शनिवारी रात्री या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या दरम्यान, सई ताम्हणकरला ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित करण्यात आला.

‘मिमी’ चित्रपटाला इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘मिमी’ चित्रपटामध्ये एका सरोगेट आईची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही मुख्य भूमिका अभिनेत्री कृति सेनन ने साकारली आहे. सई ताम्हणकरने चित्रपटात कृतिच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे.

 


हेही वाचा :http://Karan Johar ची पार्टी पुन्हा बनली कोरोना स्प्रेडर, पार्टीतील बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण