घरमनोरंजनSaif Ali Khan ची कार्बन कॉपी मुलगा jeh; बहीण saba Ali Khan...

Saif Ali Khan ची कार्बन कॉपी मुलगा jeh; बहीण saba Ali Khan ने शेअर केला फोटो

Subscribe

जेहची धाकटी आत्या सोहा अली खाननेही त्याचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जेह डान्स करताना दिसतोय. तर आजूबाजूला बसलेले सर्वजण टाळ्या वाजवत आहेत

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा धाकटा मुलगा जहांगीर अली खान आज एक वर्षाचा झाला आहे. जहांगीर उर्फ जेह याच्या आज पहिल्या वाढदिवस असल्याने त्याच्या कुटुंबात एक आनंदाचे वातावरण आहे. सकाळपासूनच आई करिनापासून आत्या सबा अली खान आणि सोहा अली खान त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

जेहच्या वाढदिवसाच्या आनंदात सबा अली खानने जेहचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जेह एका खेळण्यासोबत खेळताना दिसतोय. तसेच खेळताना कॅमेऱ्यासाठी पोजही देतोय. जेहच्या या फोटोसोबत सबाने भाऊ सैफ अली खानचा बालपणीचा फोटोही शेअर केला आहे. सैफ अली खान आणि मुलाचे एकत्र फोटो पाहिल्यास दोघांमधील फरक सांगता येणार नाही. कारण जेह वडील सैफ खानच्या बालपणीची एकदम कार्बन कॉपी दिसतोय.

- Advertisement -

हे फोटो शेअर करताना सबाने लिहिले की, ‘मेरी जान जेह…. आज एक वर्षाचा झाला. देव तुला सुरक्षित ठेवो. तो अगदी त्याच्या वडिलांसारखा दिसतो, नाही का? सबाच्या या पोस्टवर युजर्स अनेक भन्नाट कमेंट करत आहेत. काहींनी छोट्या जेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर काहींचे म्हणणे आहे की, जेह वडील सैफपेक्षा अम्मा करीनासारखा दिसतो. तर काही जण सैफ आणि जेहला ट्विन्स म्हणत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Soha (@sakpataudi)

- Advertisement -

सोहाने शेअर केला एक क्यूट व्हिडिओ

जेहची धाकटी आत्या सोहा अली खाननेही त्याचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जेह डान्स करताना दिसतोय. तर आजूबाजूला बसलेले सर्वजण टाळ्या वाजवत आहेत. सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काय? हा माझा पहिला वाढदिवस आहे. #Happy birthday जेह बाबा.’

या व्हिडिओवर कमेंट करताना श्वेता बच्चनने जेहला क्यूट असे म्हटले आहे. करीना कपूर खाननेही तिच्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. करिनाने तैमूर आणि सैफ अली खानसोबत काढलेले जेहचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एकामध्ये तो सैफसोबत एका झाडाच्या फांदीशी खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या फोटोत जेह आणि तैमूर गुडघ्यावर रांगताना दिसतोय.

करीना आणि सैफचा मुलगा जहांगीर अली खान उर्फ जेह याचा जन्म 21 फेब्रुवारी 2021 रोजी झाला. दोघेही आधीच पाच वर्षांच्या तैमूर अली खानचे पालक आहेत. तैमूरप्रमाणे जेहचेही स्वतःचे चाहते आहेत. मात्र जेह हा नेमका सैफ की करीना कोणासारखा दिसतो हे चाहते अजूनही ठरवू शकलेले नाहीत. त्याचवेळी करिनाचे वडील रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेह तिच्यासारखा दिसतो, पण तो सैफसारखा शांत आणि गंभीर आहे.


‘बाबू’ शेठचा जलवा आता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -