घरमनोरंजन'सरताज'चा ४८वा बर्थडे, सेलिब्रेशनची धमाल

‘सरताज’चा ४८वा बर्थडे, सेलिब्रेशनची धमाल

Subscribe

  'सॅक्रेड गेम्स' या लोकप्रिय वेबसिरीजमध्ये सैफने साकारलेलं 'सरताज' हे पात्र लोकांना खूप भावलं. 

अभिनेता सैफ अली खान आज ४८ वर्षांचा झाला. सैफने आपल्या फॅमिली मेम्बर्ससोबत केलेल्या खास बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सैफचे जगभरातील लाखो फॅन्स त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून  वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सैफ अली खानच्या या खास बर्थडे सेलिब्रेशनमध्ये पत्नी करिना कपूर खान, बहिण सोहा अली खान, जिजा कुणाल खेमू आणि मुलगी सारा अली खान यांच्यासह अन्य कुटुंबीय सहभागी झाले होते. दरम्यान सैफची पूर्व पत्नी आणि सारा अली खानची आई- अमृता अरोरा या पार्टीत सहभागी न झाल्याने सोशल मीडियावर त्याची जबरदस्त चर्चा होते आहे. उपलब्ध माहितीनुसार, सैफच्या बर्थडेसाठी करिना कपूरने ही खास पार्टा आयोजित केली होती. या पार्टीमध्ये सैफला आवडणाऱ्या खाण्या-पिण्याच्या सर्व पदार्थांची रेलचेल होती. नातेवाईक वगळता सैफच्या आयुष्यातील अन्य जवळच्या लोकांना तसंच त्याच्या मित्रपरिवाराला या पार्टीसाठी आमंत्रण देण्यात आले होते. चला, एक नजर टाकूया सैफ अली खानच्या धमाल बर्थडे सेलिब्रेशनवर…
करिनाची बहिण करिश्मा कपूरही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. सैफ अली खान आणि करिश्मा कपूर यांची मैत्री खूप जुनी आहे. त्या दोघांनी चित्रपटांमध्ये एकत्र कामही केले आहे. त्यामुळे पतवडींच्या घरातील जवळपास सर्वच समारंभांना करिश्मा कपूरची आवर्जून हजेरी असते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -