घरमनोरंजनMai Trailer : साक्षी तन्वरच्या 'माई' या थ्रिलर सीरिजचा ट्रेलर रिलीज

Mai Trailer : साक्षी तन्वरच्या ‘माई’ या थ्रिलर सीरिजचा ट्रेलर रिलीज

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तन्वरने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत दाखवून दिले की, तिने जी पात्र साकारली त्या पात्रांसाठी तिने अधिक मेहनत घेतलीय. आता पुन्हा एकदा साक्षी प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण लवकरचं नेटफ्लिक्सवर तिची आगामी ‘माई’ ही वेबसीरिज रिलीज होत आहे. या वेबसीरिजमध्ये साक्षी तन्वर एका जबरदस्त भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा दमदार ट्रेलर रिलीज झाला.

या वेबसीरिजमध्ये साक्षी एका आईच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्यात ती तिच्या मुलीच्या हत्याराचा शोध घेताना दिसत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला मुलीची भूमिका साकारणारी वमिला तिच्या आईला म्हणजेच साक्षीला हातवारे करत काहीतरी समजावून सांगत आहे. पण तेवढ्यात एक ट्रक येऊन तिला चिरडून जातो. यानंतर आई आपल्या मुलीच्या हत्याराचा शोध घेत असते. मात्र मुलीच्या खुन्याचा शोध घेत असताना साक्षीला अनेक धमक्या येतात. गुंडांचे हल्ले होतात. अशा परिस्थितीत आईचे असे एक रुप बाहेर येते ज्याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल.

- Advertisement -

या ट्रेलरने आता प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढवली आहे. सोशल मीडियावर हा ट्रेलर झपाट्याने ट्रेंड होताना दिसत आहे.

- Advertisement -

या वेबसीरिजमध्ये साक्षी तन्वर व्यतिरिक्त अभिनेत्री रायमा सेन आणि वामिका गब्बीसारखे अनेक स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचबरोबर साक्षी पूर्णपणे वेगळ्या आणि जबरदस्त स्टाइलमध्ये दिसत आहे. त्याच्या व्यक्तिरेखेत अनेक पदर खुलताना दिसत आहेत. साक्षीच्या कारकिर्दीतील ही सर्वात दमदार भूमिका मानली जाते.

या सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिजची निर्मिती बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्माची प्रोडक्शन कंपनी क्लीन स्लॅट्जने केली आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्का या प्रॉडक्शन कंपनीपासून वेगळी झाली होती. ‘माई’ ही वेबसीरिज 15 एप्रिलला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -