Antim Song Hone Laga Video: भाईजानच्या ‘अंतिम’ चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित

salman khan aayush sharma mahima makwana starrer antim the final truth new romantic song hone laga released
Antim Song Hone Laga Video: भाईजानच्या 'अंतिम' चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माच्या (Aayush Sharma) ‘अंतिम: द फाईनल ट्रूथ’ (Antim : The Final Truth) चित्रपटातील नवं गाणं ‘होने लगा’ (Hone Laga) प्रदर्शित झालं आहे. ‘होने लगा’ हे एक रोमँटिक गाणं आहे. गाण्यात आयुष शर्मा आणि महिमा मकवाना (Mahima Makwana) यांच्यातील लव्ह कॅमिस्ट्री दिसत आहे.

‘अंतिम’ चित्रपटातील नवं गाणं ‘होने लगा’ जुबिन नौटियालाने गायलं आहे. तसेच गाण्याचे बोल शब्बीर अहमदने लिहिले आहे. तसेच गाण्यात आयुष शर्मा आणि महिमा या दोघांची सुंदर केमिस्ट्री दाखवण्याचे काम म्हणजे कोरियोग्राफी शबिना खान आणि उमेश जाधवने केली आहे. तर भरत मधुसुधनन आणि सचिन बसरुरने या गाण्याची निर्मिती केली आहे.

‘होने लगा’ गाणं प्रदर्शित होताच अवघ्या तीन तासांत १.२ मिलियन व्ह्यूज मिळाले. तर ५६ हजारांहून अधिक लाईक्स आणि २ हजारांहून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या. यापूर्वी ‘अंतिम’ चित्रपटातील ‘भाई का बर्थडे’ हे गाणं प्रदर्शित झालं होत.

दरम्यान महिला मकवाना सलमानच्या ‘अंतिम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. यापूर्वी २०१७मध्ये महिमाने ‘वेंकटपुरम’ या चित्रपटातून साउथ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. सलमानचा आगामी ‘अंतिम’ चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष खलनायकाच्या भूमिकेत असेल.


हेही वाचा – रवीना टंडनची पहिली वेबसीरिज ‘Aranyak’चा प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला