घरमनोरंजनसलमान आणि रेमो पुन्हा एकत्र

सलमान आणि रेमो पुन्हा एकत्र

Subscribe

‘रेस ३’ दोन दिवसात प्रदर्शित होत आहे. सलमान खानला पहिल्यांदाच रेमोनं दिग्दर्शन केलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? रेमोनं ‘रेस ३’ पूर्वीच सलमानला आपल्या डान्ससंबंधित चित्रपटासंबंधी विचारणा केली होती. सलमाननं या चित्रपटाला होकार दिला होता. मात्र सलमाननं ‘रेस ३’ नंतर आता या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी होकार दिला आहे.

सलमान एक उत्तम अभिनेता आणि डान्सर – रेमो

‘बजरंगी भाईजान’मधील ‘ले ले रे सेल्फी’ गाण्यावर नृत्यदिग्दर्शन केल्यानंतर रेमोनं प्रथमच ‘रेस ३’ मध्ये सलमानच्या चित्रपटासाठी दिग्दर्शन केलं आहे. पण त्यापूर्वीच सलमानला आपल्या डान्सवर आधारित चित्रपटात सलमाननं काम करावं असं रेमोनं म्हटलं होतं आणि त्यासाठी सलमानकडून मान्यतादेखील मिळवली होती. ‘या चित्रपटाची कथा खूप चांगली आहे. या कथेसाठी एक चांगला अभिनेता हवा होता जो डान्सदेखील करू शकेल. त्यामुळंच मी सलमानला यामध्ये घेतलं. हे रेस ३ पूर्वीच होणार होतं पण रेस ३ च्या तारखांमुळं हे घडू शकलं नाही.’ इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रेमोनं हे स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

सलमान या चित्रपटासाठी नव्हता तयार

रेमोनं जेव्हा सलमानला कथा ऐकवली होती तेव्हा सलमान सुरुवातीला हा चित्रपट करण्यासाठी तयार नव्हता. ‘मी हा चित्रपट करण्यासाठी सतत नृत्याचं प्रशिक्षण घेत होतो. प्रशिक्षण घेत असताना पहिले माझे गुढघे दुखायला लागले, मग खांदे आणि मग कंबर कामातून गेली. त्यामुळं हा चित्रपट करण्यासाठी मी जरा वेळ लावत होतो.’ सलमाननं आपल्या विनोदी शैलीत आपलं मत मांडलं. ‘त्याचदरम्यान रमेश तौरानी रेस ३ घेऊन आल्यामुळं आधी हा चित्रपट पूर्ण केला.’ असंही त्यानं स्पष्ट केलं. ‘रेस ३’ शुक्रवारी १५ जूनला प्रदर्शित होत असून लवकरच रेमो आणि सलमान आपल्या पुढील चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करतील.

remo-salman
रेमो डिसुझा आणि सलमान खान (सौजन्य – ग्लॅमर अलर्ट)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -