घरमनोरंजनसलमान खानने साजरा केला गर्लफ्रेंड यूलिया वंतूरचा वाढदिवस; वाढदिवसाला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

सलमान खानने साजरा केला गर्लफ्रेंड यूलिया वंतूरचा वाढदिवस; वाढदिवसाला बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Subscribe

नुकताच यूलियाचा वाढदिवस पार पडला. त्याचं निमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकार तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर वारंवार एकत्र दिसून येतात. नुकताच यूलियाचा वाढदिवस पार पडला. त्याचं निमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकार तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. सोशल मीडयावर यूलियाच्या वाढदिवसाचे फोटो समोर आले आहेत. ज्या फोटोंमध्ये सलमान खान सुद्धा दिसून आला. याव्यतिरिक्त सलमानचा भाऊ सोहेल खान, आयुष शर्मा संगीतकार साजिद सुद्धा दिसून आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Iulia Vantur (@vanturiulia)

बर्थडे पार्टीतील एक फोटो शेअर करत सलमान खान आणि आयुष शर्माने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिलं की, यूलियाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नेहमी हसत आणि आनंद पसरवत राहा.या फोटोमध्ये यूलियाने वन-शोल्डर ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. यूलिया वंतूरने केक कापतानाचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोखाली यूलियाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “माझे प्रिय व्यक्ती, मी आज खूप खूश आहे. प्रेम करणं खूप छान वाटतं आणि मला हे प्रेम शेअर करायला आवडतं. मी माझ्या आयुष्यात चांगल्या लोकांना मिळवून स्वताःला खूप नशीबवान समजते. माझ्या वाढदिवसाला खास करण्यासाठी खूप खूप धन्यवाद”

- Advertisement -

यूलियाने मानले आभार
यूलियाने पुढे लिहिलंय की, “कोणतंच प्लानिंग नाही…फक्त दिल….दोस्ती आणि मस्ती! माझ्या आयुष्यात तुमची जागा खूप खास आहे. खूप बरं झालं असतं जर माझ्या जवळचे सगळे लोक काल रात्री माझ्यासोबत असते.तुमच्या मॅसेज आणि प्रेम आणि शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद”


हेही वाचा :‘स्वयंवर मिका दी वोटी’ पार पडला फिनाले, मिकाने १३ वर्षं जुन्या मैत्रिणीची केली पत्नी म्हणून निवड

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -