घरलोकसभा २०१९जरा हटके'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकवर सलमान नाराज

‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकवर सलमान नाराज

Subscribe

दिग्दर्शकाच्या मृत्यू नंतर १९९७ मधील 'दस' हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तर या अपूर्ण चित्रपटातील 'सुनो गौर से दुनिया वालो' हे गाण 'पीएम नरेंद्र मोदी' या बायोपिकमध्ये चित्रीकरण होत असल्याने सलमान खान नाराज असल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेकांनी हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच टीका करण्यास सुरूवात झाली आहे. आता ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटामध्ये ‘१९४७: अर्थ’ या चित्रपटामधील ‘ईश्वर अल्ला’ हे गाण आणि ‘सुनो गौर से दुनिया वालो’ हे ‘दस’ या प्रदर्शित न झालेल्या चित्रपटातील गाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये चित्रित करण्यात येणार आहे. तर यासंबंधीत निर्माते संदीप सिंह यांनी या गीतांचे श्रेय गीतकारांना दिला आहे. तेसच संदीप यांनी स्पष्ट केले की, काही जण यागोष्टीमुळे खूश नाही आहेत. ‘सुनो गौर से दुनिया वालो’ हा प्रदर्शिक न झालेल्या ‘दस’ चित्रपटातील गाण ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटामध्ये घेतल्यामुळे बॉलीवुडाचा दबंग सलमान खान प्रचंड नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गाण्याचे मूळ चित्रीकरण

प्रदर्शित न झालेल्या ‘दस’ या चित्रपटामध्ये ‘सुनो गौर से दुनिया वालो’ हे गाण सलमान खान, संजय दत्त आणि शिल्पा शेट्टी यांच्या सोबत या गाण्याचे चित्रीकरण झाले होते. मुकुल आनंद हे ‘दस’ चित्रपटाचे एक भाग होते. त्यांच्या मृत्यू नंतर हा चित्रपट अपूर्ण राहीला होता. तर आता विवेक ऑबेरॉयच्या भूमिकेतील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात हे गाण चित्रित केले जात असल्याचे सलमान खानला समजले असता त्यांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत चांगले संबंध असल्यामुळे हा वाद जास्त ताणणार नाही’, असे सलमानने म्हटले आहे.

- Advertisement -

आतापर्यंतचे बायोपिकचे वाद

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटातील मोदींच्या भूमिकीकेतील अभिनेता विवेक ऑबेरॉय याचे लूक प्रदर्शित झाले. त्यावेळी ते लूक युजर्सकडून चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर गोव्यातील काँग्रेस विद्यार्थी सेनेनेकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर येणाऱ्या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. सुरुवातीला १२ एप्रिल प्रदर्शनाची तारिख होती ती तारिख बदलून ५ एप्रिल करण्यात आली होती. तसेच या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले त्यावेळी ही श्रेय नामावलीत जावेद अख्तर, समीर आणि प्रसून जोशी अशा तिघांची नावे गीतकार म्हणून लिहिण्यात आली होती. तर या श्रेय नामवलीमध्ये माझे नाव कस काय? हा प्रश्न जावेद अख्तर यांनी ट्विट करून व्यक्त केला होता. तसेच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सुद्धा ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप घेतला आहे. तर नुकतेच दबंग सलमान खानही या चित्रपटावर नाराज असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -