घरमनोरंजनसलमान सांगतोय..करोनाशी कसे करा दोन हात!

सलमान सांगतोय..करोनाशी कसे करा दोन हात!

Subscribe

करोना व्हायरस सध्या अनेक देशात मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे. याचा परिणाम आता सिनेसृष्टीत देखील झाल्याचे दिसत आहे. चीनबाहेरही करोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. चीनबाहेर दक्षिण कोरिया, इराण, इटलीमध्ये अनेक नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. इराणमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. भारताकडूनही जास्तीत जास्त दक्षता घेण्यात येत आहे. तरीही प्रशासनाकडून नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

बॉलिवूड सेलिब्रिटींनीही याबाबत दक्षता पाळल्याचे दिसते. सेलिब्रिटींना कामानिमित्त सतत प्रवास करावा लागतो. यामुळेच त्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडले. अनुपम खेर यांनी नव्या व्यक्तीला भेटताना हात मिळवण्याऐवजी नमस्कार करण्याचा सल्ला दिला. करोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्यामुळे शक्य तितकं लांबून संवाद साधा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

अभिनेता सलमान खाननं अपलोड केलेला त्याचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. त्याला निमित्त ठरलंय ते करोनाचं. यात तो नमस्ते करताना दिसतोय. करोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आता मोठ्या प्रमाणावर व्यक्त होतेय. त्यामुळे एकमेकांशी हस्तांदोलन करणं टाळलं जातंय. म्हणूनच, ‘नमस्ते करण्याची आपली जुनी भारतीय परंपरा खूप चांगली आहे’ असं सांगत त्यानं भारतीय परंपरेचे गोडवे गायले आहेत. ‘करोनाचा धोका टळला की हस्तांदोलन करा, मिठी मारा’ असा सल्ला द्यायलाही तो विसरलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -