घरमनोरंजन'सविता दामोदर परांजपे'ची परदेशवारी!

‘सविता दामोदर परांजपे’ची परदेशवारी!

Subscribe

सविता दामोदर परांजपे हा चित्रपट आता अमेरिकेत प्रदर्शित होत आहे. शुक्रवारी ३१ ऑगस्टला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आणि येत्या शुक्रवारी (७ सप्टेंबर) अमेरिकेतील चित्रपटगृहांतून झळकणारआहे.

मराठी चित्रपटांची परदेशवारी ही काही आता नवीन गोष्ट नाही. पण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे या चित्रपटाने मिळवला आहे. गेल्या शुक्रवारी ३१ ऑगस्टला हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आणि येत्या शुक्रवारी (७ सप्टेंबर) अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकणारआहे. ऑस्टिन, शिकागो, लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन, सॅनफ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगृहात ‘सविता दामोदर परांजपे’ प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने १ कोटीच्या उत्पन्नाचा आकडा पार केला आहे. राज्यभरातील २३२ चित्रपटगृहांतून या चित्रपटाचे दररोज ४१० शोज दाखविले जात आहेत. बऱ्याच काळानंतर एक उत्तम थरारपटाचा अनुभव प्रेक्षक घेत आहेत.

तगडी स्टारकास्ट

अभिनेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केले आहे. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू–अरोरा, निशा उपाध्याय-कापाडिया या गायकांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध झाली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -