घरमनोरंजनज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!!

ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!!

Subscribe

सुपरहिट चित्रपाटांना संगीत देणारे सुप्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे नागपुर मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विजय पाटील यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी एका न्यूजचॅनलला दिली आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’ यासारख्या सुपरहिट चित्रपाटांना संगीत देणारे सुप्रसिद्ध संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे नागपुर मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विजय पाटील यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी एका न्यूजचॅनलला दिली आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कोरोना संक्रमित नव्हते तरी सुरक्षेअंतर्गत त्यांनी 6-7 दिवसापूर्वी कोरोनाची लस घेतली होती. या नंतर त्यांना आणखी त्रास होऊ लागला आणि रात्री 2 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे आकस्मित निधन झाले.महाराष्ट्रातील नागपुर येथे विजय पाटील यांचा जन्म झाला होता. 1977 मध्ये ‘एजंट विनोद’ हा चित्रपट साईन केल्या नंतर राम लक्षण फेम मधील त्यांचा जोडीदार राम यांचे निधन झाले होते. आपल्या मित्राच्या आठवणीकरिता त्यांनी राम – लक्ष्मण याच नावाने संगीत सृष्टीत नाव कायम ठेवलं. तसेच राजश्री प्रोडक्शन्स मधील अनेक सुपरहिट चित्रपटांना त्यांनी संगीतबद्द केले आहे. दादा कोंडके यांच्या अनेक मराठी हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. आपल्या कारकिर्द दरम्यान त्यांनी 75 पेक्षा अधिक सिनेमामध्ये संगीतक्षेत्रात आपलं योगदान दिलं आहे.

- Advertisement -

लता मंगेशकर यांनी विजय पाटील यांच्या निधनाची बातमी ऐकताच दुख:व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहलं आहे की.”मला नुकतच काळाले आहे की लोकप्रिय संगीतकार राम लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे निधन झाले आहे. ते खूप चांगले व्यक्ती होते. मी त्यांची अनेक गाणी गायली आणि ती खूप प्रसिद्ध झाली. मी त्यांना विनम्र श्रांधजली अर्पण करते.


हे हि वाचा –

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -