घरमनोरंजनवाढदिवसानिमित्त शाहरुख खानचा मोदींसाठी खास संदेश; ट्वीटने वेधले चाहत्यांचे लक्ष

वाढदिवसानिमित्त शाहरुख खानचा मोदींसाठी खास संदेश; ट्वीटने वेधले चाहत्यांचे लक्ष

Subscribe

अभिनेता शाहरुख खान याने सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक सल्ला सुद्धा दिला त्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 17 सप्टेंबर 2022 रोजी 72 व वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देश – विदेशातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान याने सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक सल्ला सुद्धा दिला त्याने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हे ही वाचा –  पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या 1200हून अधिक भेटवस्तूंचा उद्यापासून ई-लिलाव

- Advertisement -

मोदींच्या वाढदिवसा निमित्त त्यांना अनेकांकडून त्यांना शुभेच्छा येत आहेत. अशातच अभिनेता शाहरुख खान सुद्धा मागे राहिलेला नाही. शाहरुख खाननेही ट्विट करून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“देश आणि देशवासियांच्या कल्याणाप्रती असलेला तुमचा सेवाभाव कौतुकास्पद आहे. तुमची ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला शक्ती आणि आरोग्य लाभो. सर, आता एक दिवस सुट्टी घ्या आणि तुमचा वाढदिवस साजरा करा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” अशा आशयाचे ट्विट शाहरुख खानने केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – पंतप्रधान मोदींनी घेतली पुतीन यांची भेट, विद्यार्थ्यांच्या बचावासाठी मदत केल्याबद्दल पंतप्रधानांनी मानले युक्रेनचे आभार

यापूर्वीही बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने मोंदींसाठी खास पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. ‘लहानपणी रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहा विकण्यापासून ते या पृथ्वीतलावरचा सर्वात शक्तिशाली माणूस बनण्यापर्यंत, किती अविश्वसनीय प्रवास आहे. आम्ही तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो’ असा संदेश सुद्धा कंगनाने तिच्या पोस्ट मध्ये मोदींसाठी लिहिला.

हे ही वाचा –  SCO शिखर परिषदेच्या मंचावर दिसणार PM मोदी आणि पुतिन यांची मैत्री, जिनपिंग यांच्याशी होणार का चर्चा?

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -