शाहिद कपूरची बहिण बनणार ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्याची सून

सना आणि मयंक २ मार्चला महाबळेश्वर येथे लग्न करणार आहेत. कपूर आणि पाहवा कुटुंबिय लग्नस्थळी पोहोचले असून जवळची मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थित लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून आज मेहंदी आणि संगीत कार्यक्रम आहे.

shahid kapoor sister sanah marry seema manoj pahwas son mayank
शाहिद कपूरची बहिण बनणार 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची सून

बॉलिवूडमध्ये मागच्या काही महिन्यांपासून लग्नाचा मोसम सुरू आहे. अनेक बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री लग्न करत आहेत. कतरिनापासून मौनी रॉय पर्यंत अनेक कलाकारांनी मागच्या काही महिन्यात लग्नगाठ बांधली. नुकतेच अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांनीही लग्न केले. अशातच आता दिग्गज कलाकार सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांची मुलगी म्हणजे अभिनेता शाहीद कपूरची बहिण सना कपूरही लग्न करत आहे. सनाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांची सून होणार आहे. सना मयंक पाहवा याच्याशी लग्न करत आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, सना आणि मयंक २ मार्चला महाबळेश्वर येथे लग्न करणार आहेत. कपूर आणि पाहवा कुटुंबिय लग्नस्थळी पोहोचले असून जवळची मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थित लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून आज मेहंदी आणि संगीत कार्यक्रम आहे.


पाहवा आणि कपूर आहे फॅमिली फ्रेंड

पाहवा आणि कपूर हे गेल्या अनेक वर्षांपासून फॅमिली फ्रेंड आहेत. सना आणि मयंक अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. काही महिन्यांआधी दोघांचा साखरपुडा देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शाहीद कपूरची बहिण सना कपूरने ‘शानदार’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहेत. पंकज कपूरही सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा – Mahashivratri : बॉलिवूड सेलिब्रेटी महाशिवरात्रीला महादेवापुढे नतमस्तक