घरमनोरंजनशाहरुखच्या 'पठाण'चा बॉक्स ऑफिसवर धिंगाणा; पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

शाहरुखच्या ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर धिंगाणा; पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ काल (25 जानेवारी) संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. एकीकडे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते तर दुसरीकडे या चित्रपटाला हिंदू संघटनांकजून विरोध केला जात होता. दरम्यान, आता पठाण चित्रपट पाहून आलेले प्रेक्षक चित्रपटाचं तसेच शाहरुख खानचं कौतुक करत आहेत. अनेकांना पठाण चित्रपटाची भुरळ पडली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे.

‘पठाण’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी
शाहरुख आणि दीपिकाच्या ‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी करोडोंची कमाई केली आहे. मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने देखील लाखो तिकीटांची विक्री केली होती. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल 52.20 कोटींची कमाई केली असून पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

- Advertisement -

दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगनेही विक्रम केला आहे.

शाहरुखचं 4 वर्षानंतर पदार्पण
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

- Advertisement -

हेही वाचा :

‘पठाण’ची क्रेझ; पहिल्याच दिवशी बंप्पर कमाई; मध्यरात्रीचे शो हाऊसफुल्ल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -