‘पठाण’ची क्रेझ; पहिल्याच दिवशी बंप्पर कमाई; मध्यरात्रीचे शो हाऊसफुल्ल

Shah Rukh Khans film pathan gets unprecedented response YRF adds midnight shows

बॉलिवूड बाहशाह, किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. जवळपास 4 वर्षांनंतर अभिनेता शाहरुख खान या चित्रपटातून सिल्वर स्क्रीन झळकला आणि चाहतेही त्यांच्या नव्याने प्रेमात पडले. त्यामुळे ‘पठाण’ आता बॉलिवूडसाठी नवं ऑक्सिजन ठरत आहे. 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप चॅलेंजिंग गेलं मात्र शाहरुखच्या ‘पठाण’मुळे 2023 हे वर्षतरी दमदार ठरेल अशी आशा व्यक्त होतेय. अभिनेत्री दिपिका पदुकोणने या चित्रपटात परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. मात्र त्यानंतरही
हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली आहे.

किंग खानवरील प्रेमापायी ‘पठाण’चे आत्तापर्यंतचे आणि पुढील काही दिवसांपर्यंतचे सर्व शो हाऊसफुल्ल आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. तरण आदर्शच्या म्हणण्यानुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरी केली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिसचा एकूण आढावा घेतला तर दुपारी 3 वाजेपर्यंत ‘पठाण’ने सुमारे 20 कोटींची कमाई केल्याचे बोलले जात आहे.

तब्बल वर्षभरात पहिल्यांदाच असं घडत आहे, जिथे एका चित्रपटाच्या रात्री 12 वाजताच्या शोसाठी थिएटर सुरु राहणार आहे. यामुळे शाहरुखच्या पठाणने खरोखरचं इतिहास रचला आहे. चाहत्यांमध्ये किंग खानचा चित्रपट पाहण्याची उत्साह पाहून YRF च्या मेकर्सनी रात्री उशीरापर्यंत शो सुरु ठेवले आहेत. तर दुसऱ्या दिवशीचे सकाळचे शो देखील वाढवले  आहेत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात अनेकांना सुट्टी असल्याने हा दिवस पूर्णपणे ‘पठाण’च्या नावे असणार आहे. जगभरात आत्तापर्यंत हा चित्रपट आठ हजार स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. तर रात्रीचे बहुतेक शो देखील हाऊसफुल्ल आहेत.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर येताच धुमाकूळ घातला आहे. ‘पठाण’ हा हिंदी चित्रपटसृष्टीत इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणारा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’ आता जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये रिलीज झालेल्या ‘पठाण’च्या एकूण स्क्रीन्सची संख्या 8000आहे, ज्यामध्ये देशांतर्गत म्हणजे भारतात 5500 स्क्रीन, परदेशात स्क्रीन्सची संख्या 2500 आहे.


DGCA कडून नियमात मोठा बदल; तिकीट श्रेणी बदलल्यास विमान कंपनीला द्यावे लागणार पैसे परत