घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरAmbadas Danve : शिंदेंकडे जाशील तर आपला संबंध संपला, दानवेंच्या आईची सक्त...

Ambadas Danve : शिंदेंकडे जाशील तर आपला संबंध संपला, दानवेंच्या आईची सक्त ताकीद

Subscribe

ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तर याबाबत दानवे यांच्या आईनींही त्यांना तारीद दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, त्यांना उमेदवारी मिळणार नसून ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पंरतु, या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगत दानवेंनी या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. पण मी जर का शिंदे गटात गेलो, तर माझ्या घरचे माझ्याशी नातेच संपवतील, असे दानवे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले. (Ambadas Danve mother gave a stern warning on the talks of joining the Shinde group)

हेही वाचा… Ambadas Danve : मी खैरेंसाठी नाही ठाकरेंसाठी काम करतो, दानवेंनी स्पष्टच सांगितले

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दानवेंना, “तुम्ही शिंदे गटात जाणार का,” असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ज्या नेत्याबद्दल चर्चा सुरू आहे, तो मी नव्हेच! मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मी सत्ता आणि खुर्चीसाठी हपापलेला नाही. उद्या मला पक्षाने सगळं काही सोडायला सांगितले तर मी तयार आहे. मी निवडणुकीसाठी गद्दारी करणार नाही. माझी आई आमच्या कुटुंबाची प्रमुख आहे. आमच्यापेक्षा जास्त संवेदनशील ती आहे. तिने मला अगोदरच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाशी बेईमानी करता कामा नये. माझ्या आईचे उद्धव ठाकरेंवर प्रेम आहे. त्यामुळे मी त्यांची साथ सोडून शिंदे गटात गेलो तर तुझा आणि आमचा संबंध संपला, अशी सक्त ताकीद आईने मला दिली आहे, असे दानवेंकडून सांगण्यात आले.

आज (ता. 16 मार्च) अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याचवेळी ते म्हणाले की, मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारा शिवसैनिक आहे. अशा उमेदवारी मिळतील किंवा मिळणार नाही, निवडून येणे किंवा न येणे या विषयांना प्राधान्य न देता संघटनेच्या विचारांना घेऊन काम करणे, असा विचार घेऊन चालणारा मी शिवसैनिक आहे. संघटनेच्या प्रमुखांकडे हट्ट करण्याचा मला अधिकार आहे. मला आग्रह करण्याचाही अधिकार आहे. पण शेवटी ते जो निर्णय घेतील, हे मान्य करणे हेही माझे कर्तव्य आहे. तर महत्त्वाचे म्हणजे पक्ष प्रमुख आम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकतो आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे आम्ही सर्व जण पालन करतो, असे म्हणत त्यांनी ते ठाकरे गटातच राहणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -