Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन BB OTT: शमिता-राकेशची जोडी सुनंदा शेट्टीला आली पसंत स्पर्धक म्हणाले, सासूबाई तयार...

BB OTT: शमिता-राकेशची जोडी सुनंदा शेट्टीला आली पसंत स्पर्धक म्हणाले, सासूबाई तयार आहेत…

शमिताची आई गेल्यानंतर, निशांत राकेशची खिल्ली उडवू लागला

Related Story

- Advertisement -

बिग बॉस ओटीटी(Bigg Boss Ott) मधील स्पर्धकांसाठी सोमवार खूप भावनिक आणि आनंददायक होता. शोच्या शेवटच्या दिवशी सर्व स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना बिग बॉसच्या घरात भेटायला आले होते. कुटुंबातील सदस्य भेटीला येणार असल्यामुळे, बिग बॉसने(Bigg Boss) सर्व स्पर्धकांना फ्रीज केले होते. तसेच फक्त त्या स्पर्धकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती ज्यांचा कुटुंबातील सदस्य आले होते.या दरम्यान, शमिता शेट्टीची(Shamita Shetty) आई देखील बिग बॉस ओटीटीच्या घरात तिला प्रोत्साहन देण्यासाठी आली. दोघेही एकमेकांना भेटल्यानंतर खूपच भावनिक झाले होते. दोघींचे डोळे देखील पाणावले.

शमिता शेट्टीची आई सुनंदा शेट्टीने(Sunanda Shetty) शमिताच्या खेळाचे प्रचंड कौतुक केले आणि तिला तू क्विन आहे असे देखील म्हटले. शमिता व्यतिरिक्त तिच्या आईने कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रशंसा केली. पण सर्वात जास्त त्यांना राकेश आणि शमिताच्या कनेक्शनची प्रशंसा केली.

- Advertisement -

शमिताच्या आईने राकेशला सांगितले की, तू आहे तसाच राहा, कोणासाठीही स्वतःला बदलण्याची गरज नाही. तू खूप छान खेळतोय.शमिताने आईला विचारले की राकेश गोड आहे का? यावर त्याच्या आईने सांगितले की राकेश खूप गोड व्यक्ती आणि एक सज्जन व्यक्ती आहे.

- Advertisement -

शमिताच्या आईनेही तिला खूप प्रेरणा दिली आणि तिला शोमध्ये सकारात्मक राहण्यास सांगितले. त्या म्हणाल्या की ,मला आपल्या मुलीचा अभिमान आहे. ती घरात अगदी साध्या मुलीसारखी जगत आहे आणि तिला कोणासाठीही स्वतःला बदलण्याची गरज नाही.शमिताच्या आईने नेहा भसीनचे देखील आभार मानले म्हणाले नेहाने नेहमीच आपल्या मुलीला पाठिंबा दिला. शमिताची आई गेल्यानंतर, निशांत राकेशची खिल्ली उडवू लागला तसेच मस्करीत बोलू लागला की तूला सासूने पसंत केले आहे. तू त्यांना आवडला आहे.


हे हि वाचा – HBD:’विकी डोनर’ ते ‘शुभ मंगल जादा सावधान’ पर्यंत,आयुष्मानने बॉलिवूडमध्ये पाडली वेगळी छाप

- Advertisement -