घरताज्या घडामोडीSidharthला ट्रिब्यूट देणारं Shehnaaz Gillचं नवं गाणं प्रदर्शित

Sidharthला ट्रिब्यूट देणारं Shehnaaz Gillचं नवं गाणं प्रदर्शित

Subscribe

शहनाज आणि सिद्धार्थ अर्धवट शूट राहिलेले गाणे प्रदर्शित

सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची जोडी खूप लोकप्रिय असून सर्वांची फेवरेट जोडी आहे. बिग बॉस सीझन १३मध्ये सिद्धार्थ आणि शहनाजची जोडी बनली होती. बिग बॉसमधील सिद्धार्थ आणि शहनाज क्यूट केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची. सिद्धार्थ शुक्लाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, त्यामुळे सिद्धार्थने जगातून जरी निरोप घेतला असला तरी प्रेक्षक मात्र त्याला विसरले नाही आहेत. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाज गिलला खूप मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी शहनाज आणि सिद्धार्थ अर्धवट शूट राहिलेले गाणे प्रदर्शित झाले होते. त्यानंतर आज सिद्धार्थ ट्रिब्यूट देणार शहनाजचे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

- Advertisement -

‘तू यही है’ शहनाजच्या या नव्या गाण्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली असून अवघ्या ५ तासांत ३५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून १ मिलियन लाईक्स मिळाले आहेत. सिद्धार्थ आणि शेहनाजची मैत्री आणि त्यांचे प्रेम त्यांच्याइतकेच सुंदर आणि निखळ होते. शेहनाजने सिद्धार्थसाठी गायलेले हे गाणे ऐकून दोघांचे चाहते फारच भावूक झाले आहेत. शेहनाज आजही सिद्धार्थवर जिवापाड प्रेम करते हे तिच्या गाण्यातून पुन्हा एकदा पहायला मिळाले आहे.

शेहनाजने गायलेल्या गाण्याची सुरुवातच ‘मुझे खेल नही तुझे जितना हैं’ या शेहनाजच्या डायलॉगने होते. बिग बॉसमध्ये शेहनाजने सिद्धार्थला हे सांगितले होते. त्यांचा तो किस्सा फारच प्रसिद्ध झाला होता. संपूर्ण गाण्यात बिग बॉसच्या घरातील सिद्धार्थ आणि शेहनाजच्या सुंदर क्षणांची झलक पहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rajinikant Health Update: ‘रजनीकांत ठीक आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका’, पत्नीने केला खुलासा

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -