घरमनोरंजनशर्लिन चोप्राने पोलिसांकडे केली साजिद खानविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार

शर्लिन चोप्राने पोलिसांकडे केली साजिद खानविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवर लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस 16’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ‘बिग बॉस 16’ मध्ये यावेळी विविध स्पर्धकांना सहभागी करण्यात आलं आहे. ‘बिग बॉस 16’मध्ये Me Too आरोपी साजिद खान सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून साजिद खानला ‘बिग बॉस 16’मध्ये घेतल्यामुळे वादविवाद सुरु झाला आहे. अभिनेत्री शर्लिन चोपड़ाने साजिद खानला ‘बिग बॉस 16’ घेतल्यामुळे आरोप केले होते.

शर्लिनने साजिद खान विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. शनिवारी रात्री जुहू पोलीस ठाण्यात शर्लिनने साजिद विरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शर्लिन म्हणाली की, महिला पोलिस अधिकाऱ्यांनी माझा जवाब नोंदवून घेतला आहे. तसेच साजिद खानला पोलीस आपला जवाब नोंदवण्यासाठी बोलवले जाईल असं शर्लिनने सांगितले आहे.

- Advertisement -

तसेच शर्लिन पुढे म्हणाली की, “जुहू पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपीला शिक्षा द्यावी. मग आरोपी कोणीही असो, तो फराह खानचा भाऊ असो किंवा सलमान खानचा लाडका असो. आज तो आरोपी बिग बॉसच्या घरात बसून आराम करतोय. मला न्याय हवाय. त्यासाठीच मी पोलिसांकडे आले आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी आणि योग्य तो तपास करुन आरोपी साजिद खानला अटक करावी.”

या आधीच्या एका मुलाखतीमध्ये शर्लिन चोपडाने सांगितलं होतं की, मी एकटी पीडित नाही. माझ्या सारख्या अनेक आहेत. सगळ्यांना समान अनुभव आला आहे. अशा राक्षसाला बिग बॉस आणि सलमान खानने आश्रय दिला आहे. तुम्हीच सांगा हे योग्य आहे का? बिग बॉसचे घर विनयभंग करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे का? साजिद खानला या कार्यक्रमामध्ये घेतल्यामुळे उर्फी जावेद, मंदाना करीमी, सोना मोहपात्रा, देवोलीना भट्टाचार्य यांनी देखील विरोध दर्शवला आहे. तसेच या संदर्भात केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना देखील त्यांनी पत्र लिहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

समांथा रूथ प्रभुने आपल्या आरोग्याबद्दल केला महत्वपूर्ण खुलासा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -