घरट्रेंडिंग'डिनर' 'त्या' कामासाठीचा कोडवर्ड, शर्लिनने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव!

‘डिनर’ ‘त्या’ कामासाठीचा कोडवर्ड, शर्लिनने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव!

Subscribe

कास्टिंग काऊच संदर्भात कोड शब्द वापरले जातात.

आत्तापर्यंत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचबद्दल खुलासा केला आहे. अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊच बद्दल बेधडक वक्तव्य केली आहेत. कास्टिंग काऊच्या घटना आज अभिनेत्रींमुळे सगळ्यांसमोर आल्या आहेत.  कास्टिंग काऊचचा खुलासा करण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतील #MeToo नावाने चळवळी सुरू झाली. हा हॅशटॅग वापरून अभिनेत्रींनी अनेक घटना समोर आणल्या. यात अभिनेत्री रश्मी देसाई ते विद्या बालन यांच्यासह अनेक महिला सेलेब्सनी आपल्या कास्टिंग काउचचा अनुभव सांगितला. आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने आपल्या मुलाखतीत एक वेगळाच खुलासा केला आहे.

- Advertisement -

तो खास शब्द

शर्लिनने कास्टिंग काऊच संदर्भात कोड शब्द वापरले जातात. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये नवीन होते तेव्हा मला निर्मात्यांनी फसवले होते. एका चित्रपट करण्यासाठी फसविले होते. चल डिनरला या शब्दाचा अर्थ आहे कॉम्प्रमाईज कर. पण मला सुरूवातीला या शब्दाचा अर्थ समजायचा नाही.

- Advertisement -

एका मुलाखतीत शार्लिन म्हणाली होती की,  मी आधी चित्रपट निर्मात्यांकडे काम मागण्यासाठी जात असे. मला असं वाटायचं की माझ्यातील कलागुण ओळखून ते आपल्याला काम देतील. मी माझा बायोडेटा घेऊन त्यांना भेटायला जात असे. पण ते म्हणायचे, आपण डिनरला भेटूयात. मी रात्री किती वाजता येऊ विचारायचे, तेव्हा ११ किंवा १२ वाजता ये म्हणायचे. तेव्हा त्याबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती.

View this post on Instagram

#weekendmood ?

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

मला नंतर समजलं की डिनरचा अर्थ काय आहे. याचा अर्थ चित्रपट निर्मात्यांच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. ‘त्याच्यासाठी, रात्रीचे जेवण म्हणजे तडजोड. हे माझ्याबाबतीत ४ ते ५ वेळा घडलं. रात्रीच्या जेवणाचा खरा अर्थ आहे मेरे पास आओ बेबी.

‘मग मी रात्रीचे जेवण न करण्याचा निर्णय घेतला. मग जेव्हा जेव्हा कोणी मला डिनर हा शब्द सांगायचा तेव्हा मी म्हणायचे की मला रात्रीचे जेवण करत नाही. मी डाएटवर आहे. तुम्ही ब्रेकफास्ट साठी फोन करा मला. माझं उत्तर ऐकल्यावर निर्मात्यांनी मला बोलवणच सोडून दिलं.


हे ही वाचा – Lockdown – खासदार अपरूपा पोद्दार यांनी मुलीचे नाव ठेवले ‘कोरोना’,कारण….


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -