घरताज्या घडामोडीशिवसेना नेत्या,अभिनेत्री उर्मिला मातोंडकर कोरोना पॉझिटिव्ह

शिवसेना नेत्या,अभिनेत्री उर्मिला मातोंडकर कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

उर्मिला मातोंडकर या गेली अनेक दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचा हजेरी लावत आहेत. नवरात्रौत्सवासतही त्यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या होत्या.

शिवसेनेच्या नेत्या तसेच प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar tested covid-19 positive) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्या घरीच क्वारंटाईन होऊन उपचार घेणार आहेत. तसेच गेल्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी ताबोडतोब कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहेत. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी पहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवसात स्वत: ची विशेष काळजी असे आवाहन देखील उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे.

- Advertisement -

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठिक असून मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्या. दिपोत्सव जवळ आला आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे या दिवसात स्वत: ची विशेष काळजी घ्या’, असे उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

उर्मिला मातोंडकर या गेली अनेक दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचा हजेरी लावत आहेत. नवरात्रौत्सवासतही त्यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या होत्या. या काळात अनेक माणसांच्या संपर्कात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा बेदी आणि निशा रावल यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता अभिनेत्री उर्मिल मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार’ प्रभाकर जोग यांचे वृद्धापकाळाने निधन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -