रणबीरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची सोनम कपूरने उडवली खिल्ली

करण जौहरच्या शोमध्ये येणारे कलाकार मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसतात. या वेळी सोनम देखील मनसोक्त बोलत होती, दरम्यान यावेळी बोलता बोलता तिने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची चेष्ठा केली

करण जौहरच्या सुप्रसिद्घ ‘कॉफी विद करण’च्या नव्या सीजनची काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली. आत्तापर्यंत या शोचे पाच एपिसोड पार पडले आहेत. या सीजनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंहने हजेरी लावली होती. त्यानंतर जान्हवी कपूर, सारा अली खान, अक्षय कुमार, समंथा रूथ प्रभू, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा, करीना कपूर आणि अमीर खान या कलाकारांनी हजेरी लावली होती. आता या शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर हजेर लावणार आहेत. नुकताच या शोच्या प्रोमोची झलक समोर आलेली आहे. ज्यामध्ये करण जौहर सोनम आणि अर्जुन बरोबर दिलखुलास गप्पा मारताना दिसत आहे. या गप्पांदरम्यान सोनमने रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची धट्टा केली आहे.

सोनमने केली रणबीर कपूरच्या चित्रपटाची चेष्टा
करण जौहरच्या शोमध्ये येणारे कलाकार मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसतात. या वेळी सोनम देखील मनसोक्त बोलत होती, दरम्यान यावेळी बोलता बोलता तिने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चेष्ठा केली आहे. सोनमने ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या टायटलची चेष्ठा केली. ती म्हणाली की, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचं नाव ‘शिवा पार्ट 1’ असायला हवं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

शिवाय प्रोमोमध्ये करण जौहरने सोनमला विचारलं की, “मॅन ऑफ द मोमेंट कोण आहे? त्यावेळी सोनम रणबीर कपूरचं नाव घेत म्हणाली की, मला वाटकं रणबीर कूपर बेस्ट आहे. कारण, आजकाल त्याला अनेकठिकाणी अयान मुखर्जीचा चित्रपट प्रमोट करताना पाहत आहे.” त्यानंतर करण तिला रणबीरच्या चित्रपटाचं नाव विचारतो तेव्हा शिवा नंबर 1 असं म्हणून हसू लागते.

यावरूनच सोनम आणि रणबीर मधील तेढ अजूनही कमी झालेली नाही हे यावरूनच लक्षात येतंय. दरम्यान, सोनम आणि रणबीरने 2007 मध्ये ‘माय लव्ह’ आणि 2018 मध्ये ‘संजू’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे.


हेही वाचा :पट्या मी तुला… प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर प्रशांत दामले यांची भावनिक पोस्ट चर्चेत