घरमनोरंजनखूप बोलावसं वाटतं, पण...बॉलिवूडच्या बहिष्कारावर अमिताभ बच्चन यांचा निशाणा?

खूप बोलावसं वाटतं, पण…बॉलिवूडच्या बहिष्कारावर अमिताभ बच्चन यांचा निशाणा?

Subscribe

अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं आहे, ज्यामधून सरळ सरळ नाही पण बॉलिवूड चित्रपटांवरील बहिष्कारावर अमिताभ यांचा निशाणा असल्याचं दिसून येत आहे.

बॉलिवूड चित्रपटांवर सध्या बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड चालू आहे. अलीकडे बॉलिवूडमधील काही चित्रपटांवर कोणत्याही कारणावरून बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. या सर्व चित्रपटांना होणारा विरोध पाहून अनेक बॉलिवूड कलाकार याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. याचंदरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्घा आपलं मत ट्वीटर अकाऊंटद्वारे मांडलं आहे.

बॉलिवूड चित्रपटांवरील बहिष्कारावर अमिताभ यांचा निशाणा?

- Advertisement -

अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं आहे, ज्यामधून सरळ सरळ नाही पण बॉलिवूड चित्रपटांवरील बहिष्कारावर अमिताभ यांचा निशाणा असल्याचं दिसून येत आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, “खूप बोलावसं वाटतं, पण बोलायचं कसं? आजकाल प्रत्येक गोष्ट मोठी होऊन जाते!” अमिताभ यांचा हा निशाणा बॉलिवूडमध्ये काही जुण्या वक्तव्यांमुळे चित्रपटावर टाकला जाणार बहिष्कार याबाबत असावा असा अंदाज बांधला जात आहे.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एकानंतर एक बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. कलाकारांनी केलेल्या काही वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त विधानांवरही पुन्हा आठवूणही त्यावर आता विरोध केला जात आहे. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. या बहिष्काराचे जिवंत उदाहरण म्हणजे आमीर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपट आहे.

- Advertisement -

लाल सिंह चड्ढावर बहिष्कार टाकणारे ट्रोलर्स आता अमिताभ बच्चनच्या ब्रह्मास्त्र चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याती मागणी करत आहेत. या चित्रपटामध्ये रणवीर मंदिरात जाताना बुट घालून जात असल्याचे दिसत आहे. या कारणावरून देखील अनेकांनी त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.

 


हेही वाचा :अमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’विरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -