Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबू कोरोना पॉझिटीव्ह

Mahesh Babu: साऊथ सुपरस्टार महेश बाबू कोरोना पॉझिटीव्ह

Subscribe

महेश बाबूने सर्वांना कोरोना विरोधी लस घेण्याचे आवाहन देखील केले आहे. महेशने त्याच्या पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे की, ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी त्वरीत लस घ्या. लस घेतल्याने रुग्णालयात उपचारांसाठी जाण्याचा धोका कमी होतो.

बॉलिवूड सिनेसृष्टी तर कोरोनाच्या विळख्यात आलीच आहे मात्र आता साऊथ सिनेसृष्टीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. साऊथ सूपरस्टार महेश बाबूला  कोरोनाची लागण झाली आहे ( Mahesh Babu corona positive)  महेशने ट्विट करत तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे. महेशसह त्याची पत्नी नम्रता शिरोडकरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. महेश आणि नम्रता या दोघांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे दोघांनी घरीच क्वारंटाइन होण्याची निर्णय घेतला आहे. घरीच त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत.

महेश बाबूने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलेय, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे मी स्वत:ला घरी क्वारंटाइन केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य उपचार घेत आहे आणि कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या आणि कोरोना चाचणी करा, असे म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे महेश बाबूने सर्वांना कोरोना विरोधी लस घेण्याचे आवाहन देखील केले आहे. महेशने त्याच्या पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे की, ज्यांनी अद्याप लस घेतली नाही त्यांनी त्वरीत लस घ्या. लस घेतल्याने रुग्णालयात उपचारांसाठी जाण्याचा धोका कमी होतो. तुम्ही घरी राहूनही उपचार घेऊ शकता. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळा आणि सुरक्षित रहा.

- Advertisement -

महेश बाबूने नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी दुबईचा प्रवास केला होता. सेलिब्रेशनसाठी महेश आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब दुबईला गेले होते. भारतात परत आल्याने सर्वांनी कोरोना चाचणी केली त्याच महेश आणि त्याच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्याच्या कुटुंबातील इतर लोकांचा कोरोना रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे.


हेही वाचा – Amitabh Bachchan : बिग बींच्या घरात कोरोनाची एंट्री ; बंगल्यातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -