घरट्रेंडिंगफक्त पादण्याच्या बिझनेसमधून सेलिब्रिटीने कमावले तासाला लाखो रूपये, आता मात्र अडचणीत आलेय

फक्त पादण्याच्या बिझनेसमधून सेलिब्रिटीने कमावले तासाला लाखो रूपये, आता मात्र अडचणीत आलेय

Subscribe

पादण्याचा बिझनेस तूफान चालत होता मात्र हा बिझनेस तिच्या जिवावर बेतला असून स्टेफनी सध्या हार्ट अटॅकचा सामना करत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सेलिब्रेटी प्रसिद्ध होण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी कधी काय करतील काही सांगता येत नाही. अनेक कलाकार आपल्या बोल्डनेसमुळे प्रसिद्ध होतात आणि बक्कळ पैसे कमावतात. मात्र अमेरिकेच्या एका स्टारने पैसे कमावण्यासाठी केलेला उद्योग पाहून तुम्ही थक्क व्हाल.

अमेरिकेची रिअलटी स्टार 900 Day Fiance मध्ये काम केलेली स्टेफनी मैटो (Stephanie Matto)  पैसे कमावण्यासाठी फार्ट म्हणजे पादण्याचा बिझनेस (fart business)  करत होती. फक्त पादण्याच्या बिझनेसमधून स्टेफनी मैटो तासाला लाखो रुपये कमावत होती. तिच्या पादण्याला अमेरिकेत प्रचंड मागणी आहे. मात्र पादण्याचा बिझनेस स्टेफनीच्या अंगाशी आलाय.स्टेफनीच्या पादण्याचा बिझनेस तूफान चालत होता मात्र हा बिझनेस तिच्या जिवावर बेतला असून स्टेफनी सध्या हार्ट अटॅकचा सामना करत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

स्टेफनी पादण्यासाठी दररोज ३ प्रोटीन शेक घेत होती. त्याचप्रमाणे एक कटोरी ब्लॅक बीनचे सूप प्यायची. अनेक वर्ष तिचे हे रुटीन सुरू होते. यामुळे तिच्या छातीत दुखायला लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती स्टेफनीला हार्ट अटॅक आल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर स्टेफनीच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या. तेव्हा तिच्या ह्रदयात गॅस जमा झाल्याचे सांगण्यात आले आणि त्याचमुळे तिला हार्ट अटॅक आला.

- Advertisement -

आठवड्याला ५० जार फार्ट विकायची

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण स्टेफनी दर आठवड्याला ५० जार फार्ट विकत होती. तिच्या प्रत्येक फार्ट जारची किंमत १ हजार डॉलर इतकी होती. प्रत्येक आठवड्यात तिला लाखोंची कमाई व्हायची. स्टेफनी सोशल मीडियावर देखील प्रचंड अक्टिव्ह होती. सोशल मीडियावर तिचे २ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. स्टेफनीने म्हटले आहे की, शरीरात जास्त गॅस जमा झाल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. श्वास घेता न आल्याने तिच्या ह्रदयावर प्रेशर आले आणि हार्ट अटॅक आला

पादण्याचा बिझनेस थांबवण्याचा निर्णय

स्टेफनच्या या बिझनेसविषयी तिच्या डॉक्टरांना काहीही माहिती नव्हते. स्टेफनीने म्हटलेय की, डॉक्टरांनी मला खाण्यापिण्यात बदल करण्यास सांगितले आणि गॅस कमी होण्यासाठी औषधे दिली तेव्हा माझा बिझनेस पूर्णपणे ठप्प होणार याची मला कल्पना आलीय. माझ्या छातीत सतत कळा येतात ते दुखण मला सहन न होणारे आहे त्यामुळे माझा पादण्याचा बिझनेस मी बंद करत असल्याचे स्टेफनने सांगितले.


हेही वाचा – Shibani Dandekar: अभिनेत्री, मॉडेल ते अँकर! मराठमोळ्या शिबानी दांडेकरची अशी आहे कहाणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -