घरमनोरंजन'या' मराठी चित्रपटाचे शुटिंग होणार परदेशात

‘या’ मराठी चित्रपटाचे शुटिंग होणार परदेशात

Subscribe

‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे. 

आशयघनता आणि व्यावसायिक गणितं याची उत्तम सांगड घालीत यशाच्या पायऱ्या चढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीचा आलेख चढता आणि गौरवशाली राहिला आहे. सशक्त विषयही उत्तम सादरीकरणातून मांडण्याची खबरदारी नव्या फळीचे निर्माते दिग्दर्शक घेताना दिसताहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्या देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी उत्साही आहेत.मराठी चित्रपटांचा आशय-विषय, तांत्रिक कौशल्य आणि निर्मीतीमूल्य पाहून मराठी चित्रपटनिर्मितीसाठी अनेकजण स्वारस्य दाखवित असतानाच घडणारी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ‘साईबाबा स्टुडिओज’ आणि ‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे.

प्रेक्षकांना काही नवीन देण्याचा प्रयत्न

टेलीव्हिजन विश्वात अनेक कलात्मक कार्यक्रम देणारी ‘साईबाबा स्टुडिओज’ ही निर्मितीसंस्था या निमित्ताने मराठीत पहिले पाऊल टाकणार आहे. तसेच ‘मला आई व्हायचंय’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीतला ‘हेमलकसा’ असे संवेदनशील विषय रुपेरी पडद्यावर आणणाऱ्या गुणी दिग्दर्शिका समृद्धी पोरे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या तीन चित्रपटाच्या यशानंतर काहीतरी नवीन करण्याचा समृद्धी यांचा मानस होता. तसेच हिंदीत एकाहून एक सरस कार्यक्रमांची निर्मिती केल्यानंतर मराठीत आपलं वेगळपण दाखवून देण्यासाठी ‘साईबाबा स्टुडिओज’चे शिवकुमार उत्सुक होते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या चित्रपटाच्या निमित्ताने वेगळी वाट चोखाळत प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्याच्या उद्देशाने हे दोघेजण एकत्र आले आहेत.

- Advertisement -

“एक चांगली निर्मातीसंस्था या नात्याने प्रेक्षकांना आम्ही काय देत आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माझ्या मनात आदर असून या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीसाठी आपलंही योगदान देता येत असल्याचं समाधान ते व्यक्त करतात.”- शिवकुमार, साईबाबा स्टुडिओज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -