घरमनोरंजनसुलोचना दीदींच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा; अमिताभ, धर्मेंद्र झाले भावूक

सुलोचना दीदींच्या जाण्याने कलाविश्वावर शोककळा; अमिताभ, धर्मेंद्र झाले भावूक

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सुलोचना दीदी यांचे काल (4 जून) निधन झाले. सुलोचना दीदी यांनी वयाच्या 94 व्या वर्षी दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शनिवारी (3 जून) सुलोचना दीदी यांची तब्येत अचानक बिघडली होती, त्यानंतर तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुलोचना दीदी यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

सुलोचना दीदी यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक दिग्गज शोक व्यक्त करत आहेत. नुकतीच एक पोस्ट शेअर करत अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, “तुमची खूप आठवण येईल” यासोबत त्यांनी त्यांच्या चित्रपटातील दोघांचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

- Advertisement -

महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या ब्लॉगमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्यात त्यांनी लिहिलंय की, “आम्ही चित्रपटसृष्टीतील आणखी एक महान अभिनेत्री गमावली आहे. सुलोजना जी… तिने माझ्या अनेक चित्रपटांमध्ये प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या आईची भूमिका साकारली आहे. त्या खूप दिवसांपासून आजारी होत्या आणि आता ती आम्हा सर्वांना सोडून स्वर्गात गेल्या आहेत.” यांच्या व्यतिरिक्त माधुरी दीक्षितने देखील एक भावनिक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisement -

Planet Marathi Filmfare Awards 2021: Veteran actress Sulochana Latkar honoured with 'Lifetime Achievement Award' | Marathi Movie News - Times of India

दरम्यान, आज (5 जून) सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सुलाचना दीदींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थनी ठेवण्यात येणार आहे. सांयकाळी 5:30 वाजता त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

50 हून अधिक मराठी चित्रपटात साकारल्या मुख्य भूमिका

सुलोचना लाटकर यांनी 40 च्या दशकात मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली आणि अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांनी 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायिकेपासून ते चरित्र भूमिकांपर्यंत काम केलं आहे, तर त्यांनी 250 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे निधन; उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -