घरताज्या घडामोडीसनी लिओनीचा मराठी ठसका 'बॅटल ऑफ भिमा कोरेगाव'मध्ये दिसणार!

सनी लिओनीचा मराठी ठसका ‘बॅटल ऑफ भिमा कोरेगाव’मध्ये दिसणार!

Subscribe

बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन रामपालचा १८१८मधील झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईवर आधारित ‘द बॅटल ऑफ भिमा कोरेगाव’ (The Battle of Bhima Koregaon) चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात सनी लिओनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘द बॅटल ऑफ भिमा कोरेगाव’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. ‘हो आली रे आली, मराठी मुलगी आली’ असे या गाण्याचे बोल आहेत. सनी लिओनीने या गाण्याचा छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तसेच सनीचा मराठी लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

काल (गुरुवारी) ‘द बॅटल ऑफ भिमा कोरेगाव’ चित्रपटातील अर्जुन रामपालने पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. आता सनी लिओनीचा पहिला लूक समोर आला आहे. या चित्रपटात कॉमेडियन कृष्णा अभिषेक देखील दिसणार आहे. रमेश थेट यांनी चित्रपटाची निर्मित केली असून हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun (@rampal72)

- Advertisement -

सनी लिओनी ‘द बॅटल ऑफ भिमा कोरेगाव’ चित्रपटा व्यतिरिक्त सनी लिओनी लवकरच आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’मध्ये दिसणार आहे. सनी लिओनी ‘बिग बॉस शो’मध्ये आल्यानंतर तिची लोकप्रियता जास्त वाढली. ज्यानंतर तिने बॉलिवूडचे अनेक चित्रपट केले.


हेही वाचा – विरुष्काची 3rd Anniversary, कोहलीने शेअर केली रोमँटिक पोस्ट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -