घरट्रेंडिंगSushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतच्या फिल्मी करिअरचा प्रवास उलगडणारी वेबसाईट चाहत्यांसाठी...

Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतच्या फिल्मी करिअरचा प्रवास उलगडणारी वेबसाईट चाहत्यांसाठी लॉंच

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput ) याचा मृत्यू होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.(Sushant Singh Rajput Death Anniversary) १४ जून २०२० मध्ये सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतची अशी अकाली एक्झिट त्याच्या चाहत्यांना चटका लावून गेली. सुशांतच्या पहिल्या मृत्यूदिनी त्यांचा फिल्मी करिअरचा प्रवास उलगडणारी वेबसाईट चाहत्यांसाठी लॉंच करण्यात आली आहे. (Sushant Singh Rajput Death Anniversary: Launch of Sushant’s Film Career Website for Fans)
www.ImmortalSushant.com असे या वेबसाइटचे नाव आहे. सुशांतने आतापर्यंत केलेले सर्व सिनेमे आणि त्याचा प्रवास या वेबसाइटच्या माध्यमातून पहायला मिळणार आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमाविषयी त्याचे चाहते या वेबसाइटच्या माध्यमातून सविस्तर जाणू घेऊ शकणार आहेत. त्याचप्रमाणे सुशांतची सिनेमाविषयी असलेली आवड, त्याची स्वप्न,शौक पूर्ण करण्यासाठी त्यानी घेतलेली मेहनत या वेबसाइटच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे. त्याचप्रमाणे सुशांतचे फोटो आणि त्यांच्या मुलाखती, सध्या सुरु असलेले सुशांतशी निगडीत ट्रेंड देखील या वेबसाइटच्या माध्यमातून एका क्लिकवर पाहता येणार आहेत.

सुशांत सिंहच्या बाबतीत सर्व माहिती या वेबसाइटवर सहज उपलब्ध होईल. सुशांतच्या संपूर्ण परिवाराची परवानगी घेऊनच ही वेबसाइट सुशांतच्या मृत्यूदिन लाँच करण्यात आली आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झालेय. वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी हे जग सोडून जाणे ही गोष्ट कोणालाच पटली आहे. आजही सुशांत आमच्यात आहे असे त्याचे चाहते म्हणतात.

- Advertisement -

सुशांतच्या वांद्रे येथील घरात सुशांतचा फासावर लटकलेला मृतदेह समोर आला. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक भुकंप देखील पहायला मिळाले. सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगण्यात आले. सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी ईडी आणि एनसीबीकडे सोपवण्यात आला. त्यातच सुशांत सिंहच्या मृत्यूमुळे बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले. सुशांतची हत्या केल्याचा आरोप त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर करण्यात आला. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात सुशांतची प्रेयसी आणि तिच्या भावाला अटक केली. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक ड्रग्ज प्रकरणे चवाट्यावर आली. आज एक वर्ष होऊनही सुशांतच्या मृत्यूचे गुढ कायम आहे.


हेही वाचा – भारताच्या कोरोना लघुपटांचा झेंडा सातासमुद्रापार

- Advertisement -

 

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -