लाल साडीत सजली स्वरा, तेलुगू पद्धतीचा ब्रायडल लूक चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाची घोषणा केली. स्वराने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेजे केलं. आता ती पुन्हा एकदा कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थित धुमधडाक्यात लग्न करणार आहे. अशातच रविवारी स्वराने तिच्या हळदीचे फोटो शेअर केल्यानंतर आता स्वराने लग्नाच्या लूकमधील फोटो देखील शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

स्वराने तिच्या लग्नामध्ये तेलुगू पद्धतीचा ब्राइडल लूक केला आहे. यात तिने लाल रंगाची साडी नेसली असून ही बनारसी साडी 94,800 हजारांची आहे. यासोबत गळ्यात सुंदर हार, कानातले, मांग टिका, नाकात नथ देथील परिधान केली आहे. तर स्वराच्या पतीने सोनेरी नेहरु जॅकेटसोबत पांढरा कुर्ता परिधान केला आहे. दोघेही या लूकमध्ये सुंदर दिसत आहेत.

16 मार्चला होणार दिल्ली रिसेप्शन

 

View this post on Instagram

 

A post shared by Deene khan (@deenekhanofficial)

12 मार्च रोजी सकाळी स्वराची हळद आणि संध्याकाळी संगीत सोहळा पार पडला. दरम्यान, आता नुकेतच स्वरा आणि फहादचे लग्न पार पडले असून 16 मार्च रोजी मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत दिल्लीत रिसेप्शन होणार आहे.

कोण आहे फहाद अहमद?

स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी फहाद जिरार अहमदसोबत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. स्वराचा पती तिच्या पेक्षा वयाने 4 वर्षांपेक्षा लहान आहे. तिचा पती समाजवादी पक्षाचा नेता आहे. त्यांची पहिली भेट 2019 मध्ये झालेल्या आंदोलनात झाली. तिथेच त्यांची चांगली ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्री, त्यानंतर प्रेम आणि आता त्याचे रुपांतर लग्नात झाले आहे.

 


हेही वाचा :

स्वरा भास्कर आणि फहाद अहमदच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल