घरक्राइम'तारक मेहत का उल्टा चष्मा'च्या रोशन भाभीचा निर्माते असितकुमार मोदींवर लैगिक छळाचा आरोप

‘तारक मेहत का उल्टा चष्मा’च्या रोशन भाभीचा निर्माते असितकुमार मोदींवर लैगिक छळाचा आरोप

Subscribe

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) या मालिकेतील सर्व पात्र लोकांना खूप आवडतात आणि ही मालिका टीव्हीवर गेल्या 15 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. परंतु गेल्या काही काळापासून ही मालिका सतत वादात आहे. त्याचे कारण असे की, मालिकेचे जुने कलाकार शो सोडून जात आहेत. नुकतेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल (Jennifer Mistry Bansiwal) म्हणजेच सोढी परिवारातील रोशन भाभी हिने देखील ही मालिका सोडली आहे, परंतु तिने मालिका सोडण्यामागचे धक्कादायक कारण सांगितले आहे. अभिनेत्रीने निर्माता असितकुमार मोदीवर (Asitkumar Modi) लैंगिक छळाचे (sexual harassment) आरोप केले आहे.

जेनिफर मिस्त्रीने सांगितले की, निर्माता असितकुमार मोदी 2019 पासून तिच्याशी गैरवर्तन करत आहे. आम्ही सिंगापूरला चित्रिकरणासाठी गेलो होतो. त्यावेळी असितकुमार मला वारंवार त्याच्या खोलीत बोलवायचा आणि मी नकार दिल्यावर तो  मस्करी करतोय असं म्हणायचा. पण तो ही गोष्ट वारंवार करत होता. तो सर्वांसमोर बसून माझ्या ओठांची स्तुती करायचा. मला वैयक्तिक संदेश पाठवचा, पण मी या सर्व गोष्टींकडे सतत दुर्लक्ष करत होते. तरीही तो अप्रत्यक्षपणे माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. माझ्या वाढदिवसाच्या दुसर्‍या दिवशी असितकुमार याने मला फोन करून सांगितले की, आता वर्धापनदिन संपला आहे, तर माझ्या रूमवर ये. हे सगळं ऐकून मला खूप वाईट वाटलं, रडायला आलं. जेनिफरने हे आरोप करताना असितकुमार मोदी, सुहेल रमानी (शोचे प्रोजेक्ट हेड) आणि जतिन बजाज (कार्यकारी निर्माता) यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

- Advertisement -

लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला
जेनिफर मिस्त्रीने सांगितले की, मालिकेच्या सेटवर अनेकवेळा माझ्याशी गैरवर्तन झाले आहे. गरोदर असताना मला मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्याचवेळी मालिकेमध्ये माझ्या पतीची भूमिका साकरणाऱ्या गुरचरण सिंग मालिका सोडणार होता. अभिनेत्रीने असा दावा केला आहे की असित मोदीने यापूर्वी तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण काम गमावण्याचा भीतीने त्यांच्या गैरवर्तनाकडे दुर्लक्ष केले. याशिवाय मालिकेच्या टीमने तिले सेटवर ‘जबरदस्तीने’ थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तिला जाऊ दिले नाही.

भिडेची भूमिका साकारणाऱ्या मंदार चंदावरकरने दिली प्रतिक्रिया
तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमध्ये आत्माराम तुकाराम भिडेची भूमिका साकारणाऱ्या मंदार चंदावरकरने जेनिफर मिस्त्रीच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, जेनिफरने असे आरोप का केले हे मला माहीत नाही. मी तिच्या आरोपांचा अजूनही विचार करत आहे. त्या दोघांमध्ये नक्की काय झाले ते मलाही माहीत नाही. पण मालिकेच्या सेटवर पुरुषप्रधान मानसिकता नाही, इथे लोकांना निरोगी आणि आनंदी वातावरण मिळते. त्यामुळे ही मालिका एवढी वर्ष सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -