Tadap Teaser: ‘बेटा बापसे भी आगे जाऐगा’, सुनील शेट्टीच्या मुलाच्या ‘तडप’मधील एन्ट्रीवर चाहत्यांच्या कमेंट्स

Tadap Teaser ahan shettys upcoming film tadap teaser out fans says papa se aage jayega beta
Tadap Teaser: 'बाप से बढकर बेटा', सुनील शेट्टीच्या मुलाच्या 'तडप'मधील एन्ट्रीवर चाहत्यांच्या कमेंट्स

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. सुनिल शेट्टीच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी अथिया शेट्टी हीने देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. आता सुनिल शेट्टीचा मुलगा अहानने देखील बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री केली आहे. अहान ‘तडप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. नुकताच ‘तडप’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरसह चित्रपट निर्मात्यांनी रिलीज डेटची घोषणा केली आहे.

‘तडप’चा टीझर पाहून प्रेक्षकांना आता चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. चाहत्यांकडूनही चित्रपटाच्या टीझरवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युजर्सने कमेंट्स करत लिहिले की, ‘मुलगा बापापेक्षाही अधिक पुढे जाईल.’ त्यामुळे अहानच्या अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी ‘तडप’चा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तारा सुतारियाने ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. मात्र ‘तडप’मधूनही तारा प्रेक्षकांची मनोरंजन करण्यास पुन्हा सज्ज झाली आहे. आता ‘तडप’ या आगामी चित्रपटामध्ये तारा आणि अहानची केमिस्ट्री पाहयला मिळणार आहेत. टीझरमधून या चित्रपटाचे कथानक लक्षात येते की, हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लूथरियाने केले आहे.