Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड ब्रेकअपविषयी बोलताना, ''ती पुढे निघून गेली आणि मी...''

नेहा कक्करचा एक्स बॉयफ्रेंड ब्रेकअपविषयी बोलताना, ”ती पुढे निघून गेली आणि मी…”

आता नेहाच्या लग्नानंतर हिमांशने त्यांच्या ब्रेकअपवर वक्तव्य केले आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर काही वर्षांपूर्वी तिच्या रिलेशनशिपबद्दल फार चर्चेत होती. अभिनेता हिमांश कोहलीसोबत तिचे प्रेमसंबंध होते. अनेक रिअॅलिटी शो मध्ये हे दोघे एकत्र ऐवून आपला रोमॅन्टिक परफॉर्मन्स द्यायचे. ही रोमॅन्टिक जोडी अनेकांच्या पसंतीस होती. मात्र २०१८ मध्ये हे दोघे वेगळे झाले. हिमांश आणि नेहाचा  ब्रेकअप झाला. यानंतर दोघांच्या ब्रेकअपचा सर्वच चाहत्यांना धक्का बसला होता. ब्रेकअप झाला. एका रिअॅलिटी शोदरम्यान नेहाने हा खुलासा केला होता. मात्र हिमांशने याबाबत मौन बाळगत कोणतीही प्रतिक्रिया केली नाही. आता काही वर्षानंतर नेहाने आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधला. २०२० मध्ये तिने गायक रोहनप्रित सिंह याच्याशी लग्नगाठ बांधली. पण आता नेहाच्या लग्नानंतर हिमांशने त्यांच्या ब्रेकअपवर वक्तव्य केले आहे.

 नुकत्याच एका मुलाखती दरम्यान, नेहाच्या आणि त्याच्या ब्रेकअपविषयी बोलताना म्हणाला की, तो माझा ब्रेकअप होता. मला जगाला सांगण्याची काही गरज नाही की माझ्या घरात काय घडले? यामुळे का दुसऱ्यांना त्रास द्यायचा? तुम्हाला का या प्रकरणात इतका रस आहे?” २०१८ मध्ये हे सर्व घडले होते. मी यासाठी नेहाला दोष देत नाही. ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली आहे आणि मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. ती देखील आनंदी आहे. मी स्वत:,साठी देखील आनंदी आहे.

- Advertisement -

 मी आपल्या स्वप्नातले आयुष्य जगत आहे. पैसे कमावत आहे. प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. पण बरेच लोक अजून ही २०१८ मध्येच ाहे. ते त्यातून पुढे जातच नाहीत. आता आपण २०२१ मध्ये आहोत. आपण त्याबद्दल काही करु शकत नाही. अनेकांना वाटते की माझ्या मुळे गोष्टी चुकीच्या घडल्या. पण मला माहिती आहे की मी वाईट व्यक्ती नाही…” हिमांश पुढे म्हणाला की, ” 45मी काही चुकीचे केले नाही आणि कोणाला त्याबद्दल सांगत बसायची गरज वाट नाही. त्यावेळी आम्ही दोघेही रागात होतो. नेहाला जे करायचे होते ते तिने केले तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. मात्र मी पोस्ट केली नाही. मी कोणालाही दोष देत नाही. म्हमून मी कधीही यावर बोललो नाही” अशी प्रतिकिया हिमांशने दिली आहे.


हे वाचा-  ” आब्रा-का-डाब्रा ” ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पडणार भुरळ!

- Advertisement -