घरताज्या घडामोडीकोरोना लसीमुळे पुरुष-महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या? आरोग्य मंत्रालयाने याचे दिले उत्तर

कोरोना लसीमुळे पुरुष-महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या? आरोग्य मंत्रालयाने याचे दिले उत्तर

Subscribe

कोरोना महामारीची लढाई अजूनही सुरू आहे. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी केंद्र सरकारने २१ जूनपासून लसीकरण मोहीमेचा आणखीन वेग वाढविला आहे. याचा परिणाम पहिल्याच दिवशी दिसला असून देशाने लस देण्याचा रेकॉर्ड केला आहे. काल, सोमवारी कोरोना लसीचे सुमारे ८० लाखांहून अधिक डोस दिले गेले आहेत. त्यामुळे असे दिसून येत की, सरकारची लसीकरण मोहीमेची नीति योग्य दिशेला जात आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले. पण अजूनही देशात असे लोकं आहेत, जे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लस घेण्यास घाबरत आहेत.

देशभरात कोरोना लसीसंदर्भात अनेक अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे अनेक लोकांनी कोरोना लसीकडे पाठ फिरवली आहे. सध्या कोरोना लस घेतल्यामुळे पुरुष आणि महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या निर्माण होते, अशी अफवा पसरली जात आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त करून एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कोरोना लसीमुळे वंध्यत्व येते हे सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका.

- Advertisement -

दरम्यान लसीकरणबाबत नॅशनल एक्सपर्ट ग्रुपने म्हणजे राष्ट्रीय विशेषज्ञ समुहाने सांगितले होते की, स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी कोरोना लस गरजेची आहे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचे आहे, कारण सध्या देशात मुलांसाठी लस नाही आहे. आता त्यांच्यावर चाचण्या सुरू आहेत. तसेच पीआयबीने नीति आयोगाचे सदस्या डॉ. वी.के पॉल आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची बातचित करताना कोरोना लसीसंबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये डॉ. वी.के.पॉल म्हणाले होते की, स्तनपान करणाऱ्या मातेसाठी लस सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारची भिती बाळगण्याची गरज नाही आणि लसीकरणाच्या अगोदर किंवा नंतर स्तनपान न करण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे. तसेच याबाबत डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, अनेक देशांनी गर्भवती महिलांचे लसीकरण सुरू केले आहे. अमेरिकेच्या एफडीएने फायझर आणि मॉडर्ना लस देण्यास मंजूरी दिली आहे.


हेही वाचा – चिंता वाढली! भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरियंटवर कोरोना लस कमी असरदार – WHO


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -